प्रतिष्ठा न्यूज

तासगावातील गुटखा माफियाँवर कारवाई करा अन्यथा मनसेकडून आंदोलनाचा इशारा : मनसे नेते अमोल काळे यांची अन्नभेसळ विभागाकडे तक्रार

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी तासगांव तालुक्यामध्ये मात्र परराज्यात उत्पादित होणारा गुटखा, सुगंधी तंबाखु,आदी पदार्थ पुरवठा करणारी टोळी तासगांव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात असल्याचे दिसत आहे.ही टोळी परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची खरेदी करून तासगांव मध्ये साठा करून तालुक्यातील अनेक दुकानदारांना वाढीव दराने राजरोस पणे विक्री करत असल्याचे दिसत आहे.शासनाकडून अवैद्य गुटखा वाहतूक करणाऱ्या विरूध्द कठोर कारवाई करण्याचे निर्देश असूनही तासगांव मध्ये कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.तासगाव पोलीस आणि सांगली पोलीस प्रशासन यांना वेळोवेळी निवेदने देऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे दिसून येत असल्याने, पुरवठा करणाऱ्यावर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी अन्नभेसळ विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की तासगाव तालुक्यातील अनेक पानपट्टीवर बाहेरच्या राज्यातुन येणारा गुटखा मोठया प्रमाणावर वितरण केला जात आहे.तालुक्यातील तरूण वर्ग व्यसनाधीन होत आहे.शाळकरी मुले ही गुटखा,माव्याच्या आहारी जात आहेत.या सर्व प्रकाराचा सांगली जिल्ह्याचा सुत्रधार नरेंद्र नानवाणी हा आहे.ही व्यक्ती सांगली मार्केट यार्ड येथून अवैद्य गुटखा संपूर्ण जिल्हयात वितरीत करीत आहे.यामध्ये विमल गुटखा,पवनबाबु गुटखा,सुंगधी सुपारी,सुंगधी तंबाखु इत्यादीचा समावेश आहे.तर तासगाव मधे मोहसीन अत्तार हा इसम विटा, खानापूर,पलूस,कडेगाव,तासगाव या भागामध्ये मोठया प्रमाणावरती गुटखा विक्री करत आहे.त्याचे १० ते १२ साथिदारांबरोबर हे काम चालू आहे. तासगाव शहरालगत गोटेवाडी रोड सहारा कॉलनी येथे त्याच्या राहत्या घरात या अवैध मालाची साठवणूक करून तासगाव शहर व ग्रामीण भागात मोटारसाईकल,स्कुटी,मारूती सुझुकीची ओमणी या वाहनाचा वापर करीत आहे.तरी या विषयात आपण स्वतः लक्ष देवून या दोघांचेवर ७ दिवसाचे आत कारवाई करणेत यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा काळे यांनी दिला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.