प्रतिष्ठा न्यूज

स्वातंत्र्याच्या ५० वर्षानंतर कुंडलच्या शेतमजूर वसाहतीत आज लागले दिवे

रणसंग्राम सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष ॲड. दिपक ‌‌(दादा) लाड यांच्या प्रयत्नाला अखेर आले यश

प्रतिष्ठा न्यूज
कुंडल प्रतिनिधी : कुंडल ता. पलूस जिल्हा सांगली येथे तब्बल ५० वर्षापासून अंधारात असलेली क्रांतीअग्रणी डॉ जी.डी बापू लाड नगर शेतमजूर वसाहत प्रकाशमय झाली रणसंग्राम सोशल फाउंडेशन चे  अध्यक्ष ॲड. दिपक लाड, महावितरण संघर्ष समितीचे अभ्यासक श्रीदास होनमाने यांनी या वसाहतीच्या वीज प्रश्नावर सातत्याने संघर्ष करत पाठपुरावा केला होता.

महावितरणचे विटा विभागीय अधिकारी श्री विनायक इदाते  साहेब यांनी या कामकाजावेळी विशेष लक्ष देऊन सहकार्य केले.

पलूसचे महावितरण चे श्री म्हेत्रे साहेब कुंडल महावितरण चे जाधव साहेब व सर्व कर्मचाऱ्यांनी
या कामी सहकार्य केले.

कुंडल येथील गावालगत ही शेतमजूर वसाहत असून अनेक वर्षापासून वीज प्रश्न प्रलंबित असलेल्या कुंडलच्या शेतमजूर वसाहतीला रणसंग्राम सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अखेर न्याय मिळाला असून अनेक वर्षापासून अंधारात चाचपडणारी शेतमजूर वसाहत खांबावरील वीज दिव्यांनी उजळली आहे.

आज महावितरण ने शेतमजूर वसाहती मधील स्ट्रीट पोल वरील वरील वीज चालू करताच वसाहत प्रकाशमय बनली, वसाहती मधील माता भगिनी, उपस्थित नागरिक व  शाळकरी मुलांनी *“भारत माता की जय”* च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला, तब्बल पन्नास वर्षानंतर वसाहतीमध्ये लाईट लागल्याने नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी वसाहती मधील माता भगिनींनी स्ट्रीट पोलचे पूजन केले. वसाहती मधील ज्येष्ठ नागरिक माता भगिनी व सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव रावळ यांच्या शुभहस्ते वीज पोलचे श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले.

यावेळी ॲड. दिपक दादा लाड यांच्या हस्ते वसाहती मधील सर्व नागरिकांचा सत्कार करण्यात आला .

ॲड. दिपक (दादा),श्रीदास होनमाने सुरेखाताई जाधव, बाळासाहेब कांबळे, सुरज सोळवंडे ,दिपाली ताई वाघमारे , शिवाजीराव रावळ यांचा स्थानिक नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना ऍड दिपक लाड म्हणाले महावितरण ने या भागात वीज वाहिण्याचे जाळे तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

आणि पहिल्या टप्प्यात स्ट्रीट पोल खांबावरील वीज देण्यात आली असून पुढील टप्प्यात सर्व घरातील वीज जोडणी करण्यात येणार आहे , यासाठी महावितरण कंपनीकडे घरगुती वीज मागणी परवानगी साठी उर्वरित सर्व घरापर्यंत वीज पोहोचवण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम म्हणजे रूपरेषा आखण्यात आली असून नागरिकांना विना त्रास सर्व कागदपत्रांची पूर्तता रणसंग्राम सोशल फाउंडेशन कार्यालय चे माध्यमातून करण्यात आली आहे असे कळविण्यात आले.

हनिफ शेख, कुमार जावीर, दत्ता करडे, अक्षय कांबळे,
अक्षय घोरपडे, महादेव कुकडे, दत्ता कुकडे, हरी कुकडे, बाळू होनमाने, यशवंत कारंडे, अजित ठोबरे बाबासाहेब भडगे, संतोष आवगडे, मालन कांबळे, सुमन पडळकर, आम्रपाली कांबळे, छाया जगधने, वच्छला गोरे, वंदना करडे, सुनीता खरात, गुंजीकर मामा यांच्या सहवासातीमधील पुरुष व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.