प्रतिष्ठा न्यूज

प्रीपेड मीटर्स रद्द करा मागणीसाठी समाजवादी पक्षाच्या वतीने इचलकरंजी महावितरण समोर निदर्शने

प्रतिष्ठा न्यूज
इचलकरंजी प्रतिनिधी : महावितरण कंपनीने आणि राज्य सरकारने प्रीपेड मीटर्स लावण्याची योजना रद्द करावी. 300 युनिटच्या आज वीजवापर असणाऱ्या सर्व म्हणजे दोन कोटी पाच लाख ग्राहकांचे मीटर्स बदलू नयेत. त्यांचे मीटर्स आहेत तेच ठेवावेत आणि प्रीपेड मीटर च्या खर्चाचा कोणताही भार त्यांच्यावर लावू नये, या मागणीसाठी आज इचलकरंजी शहर समाजवादी पार्टीच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आणि त्यानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री प्रशांत राठी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

महावितरण कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या या निदर्शनाच्या सुरुवातीस महावितरण कार्यालयासमोर “प्रीपेड मीटर्स हटाव, प्रीपेड योजना रद्द करा, प्रीपेड मीटर्स घेणार नाही, केवळ घोषणा आणि आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारचा आणि कंपनीचा धिक्कार असो, प्रीपेड मीटर्सचा कायदा अदानीचा फायदा” अशा विविध घोषणा सुरुवातीस देण्यात आल्या त्यानंतर समाजवादी पार्टीचे इचलकरंजी शहर अध्यक्ष श्री जाविद मोमीन, महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती उषा कांबळे, श्री बाबासाहेब नदाफ, श्री मुकुंद माळी आणि प्रदेश कार्याध्यक्ष श्री प्रताप होगाडे यांनी प्रीपेड मीटर्स योजनेच्या संदर्भामध्ये तपशीलवार माहिती दिली आणि योजना रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. उर्जामंत्री आणि महावितरण कंपनी यांनी ज्या पोस्ट टाकल्या आहेत, त्या केवळ घोषणा असून कोणताही अधिकृत निर्णय कंपनीने अथवा महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. तो त्वरित घ्यावा आणि राज्यातील दोन कोटीहून अधिक सर्वसामान्य गरीब वीज ग्राहकांना या बोजातून मुक्त करावे अशी मागणी करण्यात आली. प्रशांत राठी यांना निवेदन दिल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

या निदर्शनामध्ये विजय जगताप, अशोक चौगुले, रफिक नायकवडी, जयप्रकाश जाधव, पद्माकर तेलसिंगे, अनिल होगाडे, संजय होगाडे, श्रीमती सुष्मिता साळुंखे, रंगराव बोंद्रे, सुरेश आमाशी, जयराज होगाडे, अस्लम शेख, संजीवनी चिंगळे, अशफाक गवंडी, सिकंदर मुल्ला व अन्य अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.