प्रतिष्ठा न्यूज

मिरज तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या प्रमुखपदी आदिनाथ गायकवाड

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : सांगली जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून टेनिस क्रिकेट खेळाडू निर्माण व्हावेत तसेच राज्य व राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यासाठी आदिनाथ गायकवाड यांची मिरज तालुका प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. ही माहिती सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विजय बिराजदार यांनी दिली .सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट हे राष्ट्रीय शालेय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे संलग्न असून जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील खेळाडू असोसिएशन अधिकृत जिल्हा , विभाग , राज्य आणि राष्ट्रीय खेळाडूंना खेळण्याची संधी देणार आहे. यावेळी सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार विक्रमसिंह दादा सावंत , कार्याध्यक्ष – परवेज गडीकर , उपाध्यक्ष – अझहरुद्दीन शेख व संघटनेचे महंमदहुसेन शेख, धनंजय काटे , नामदेव बेळे , सिद्धेश्वर कोरे , महादेव सवाईसर्जे , स्वप्नील सुर्वे, संजय कोळी , सुनील सराटे , रवींद्र व्यवहारे , नागा घुगरे हे पदाधिकारी उपस्थित होते . मिरज तालुक्यातील खेळाडूंनी अधिक माहितीसाठी मिरज तालुका प्रमुख आदिनाथ गायकवाड (9021452616 ) यांच्याशी संपर्क साधावा .

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.