प्रतिष्ठा न्यूज

तासगाव तालुक्यासाठी मंजूर असलेली एम आय डी सी सुरु करा संजय दाजी चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या काळात तासगाव तालुक्यात एमआयडीसीला मंजुरी मिळाली होती परंतु सदर एमआयडीसीचे काम फक्त कागदपत्रावरच मंजूर दिसत असून ती अजून पूर्णत्वास गेली नाही.त्याबाबत अनेक वेळा फक्त चर्चाच झाली असून तालुक्यातील वाढती बेरोजगारी लक्षात घेता ती तातडीने होणे गरजेचे आहे. तालुक्यातील युवक फक्त शेतीवर आणि मोलमजुरीवरच अवलंबून असून त्यांच्या हाताला काम नसल्याने तो गुन्हेगारी कडे वळत असल्याचे दिसून येत आहे. आर्थिक बाबतीत ही तालुका मागासलेलाच आहे,त्यामुळे एमआयडीसी होने गरजेचे असल्याने याबाबत शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष संजय दाजी चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन एमआयडीसी चा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती तमाम शिवसैनिकांच्या वतीने केली आहे.यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन करून तातडीने तालुक्यातील एम आय डी सी बाबत चर्चा करून याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष संजय दाजी चव्हाण यांनी दिली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.