प्रतिष्ठा न्यूज

‘हलाल’ उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार घालावा, तसेच वक्फ कायद्याच्या विरोधात हिंदूंनी संघटिपणे आवाज उठवावा ! – श्री. मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : ‘हलाल’ ही इस्लामिक संकल्पना ‘सेक्युलर’ म्हणवणार्‍या भारतातील बहुसंख्य 78 टक्के हिंदूंवर थोपवली जात आहे. भारतात शासनाचे ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI), तसेच ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) हे विभाग असतांना ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’सारख्या खाजगी मुसलमान संस्था भारतीय उत्पादकांकडून हजारो रुपये घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ देत आहेत. भारतातही ‘जमियत उलेमा-ए-हिन्द’ देशभरातील विविध बाँबस्फोटांत सहभागी मुसलमान आरोपींना कायदेशीर साहाय्य करत आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था तथा सुरक्षा यांना धोका निर्माण करणार्‍या ‘हलाल’ उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकावा. विशाळगड अतिक्रमणमुक्त होण्यासाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती गेली 2 वर्षे कार्यरत आहे. राज्य संरक्षित स्मारके यांच्यावर पशुहत्या करण्यात येऊ नये, असे पुरातत्व विभागाचा आदेश असतांना विशाळगडावर पशुहत्या करण्यासाठी अनधिकृत शेड उभारले जाते. यावरून तेथील धर्मांधांना प्रशासकीय यंत्रणेचा कोणताच धाक नाही, असेच दिसून येते. तरी हिंदूंनाही आता दबावगट वाढवून प्रशासनाने अशांवर कारवाई होण्यासाठी आपली संघटितशक्ती वाढवली पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये केले. ते 12 फेब्रुवारी या दिवशी पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र जागृती सभेत बोलत होते.

या सभेसाठी मोठ्या संख्येने हिंदूंनी उपस्थिती दर्शवून हिंदु राष्ट्राचा उद्घोष केला. या सभेत सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनीही मार्गदर्शन केले. या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह आजूबाजूच्या गावातील धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी शंखनादानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. वेदमूर्ती शतानंद कात्रे, श्री. नारायण जोशी आणि श्री. गुरुप्रसाद जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. हिदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी यांनी मांडला. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी आणि सौ. भक्ती डाफळे यांनी केले.

आपल्या मार्गदर्शनात श्री. मनोज खाडये पुढे म्हणाले, वक्फ कायद्याच्या माध्यमातून हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळे यांसह सरकारची संपत्तीही सहज बळकावता येते. काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड कायद्या’त केलेल्या सुधारणांमुळे हिंदू, ख्रिस्ती, शिख, बौद्ध आणि अन्य गैरमुसलमानांची कोणतीही संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करण्याचे अधिकार दिले आहेत. असा ‘लॅण्ड जिहाद’चा काळा कायदा रहित करण्यासाठी हिंदूंना संघटितपणे आवाज उठवावा लागेल.’’

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी खारीचा नाही, तर हनुमतांप्रमाणे वाटा उचला ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
पुढारलेपणाच्या नावाखाली आपण महान हिंदु धर्मापासून दूर चाललो आहोत.आपली वेशभूषा, केशभूषा, आहार, संस्कृती, परंपरा विसरत चाललो आहोत. धर्मपालन करणे आज हिंदूंना हास्यास्पद वाटत आहे. कपाळावर कुंकू लावण्याचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. यामागील धर्मशास्त्र समजून घेतल्यास ‘कुंकू लावणे’ हा मागासलेपणा वाटणार नाही. धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केल्यास स्त्रिया सर्वदृष्ट्या सुरक्षित होऊ शकतात. छत्रपती शिवरायांच्या काळात स्त्रिया सुरक्षित होत्या. त्यामुळे हिंदवी स्वराज्याप्रमाणे महिलांसाठी सुरक्षितता असणारे हिंदु राष्ट्रच आपल्याला आवश्यक आहे. आज भारतात इस्लाम आणि ख्रिस्ती, तसेच अन्य अल्पसंख्यांक पंथांना विशेष संरक्षण दिले गेले आहे; पण देशातील बहुसंख्यांकांच्या, म्हणजेच हिंदु धर्माला कोणतेही राजकीय संरक्षण प्राप्त नाही. त्यामुळे भारतात अल्पसंख्यांकांच्या विरुद्ध अन्याय घडल्यास ‘अल्पसंख्यांक आयोग’ असतो. अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी स्वतंत्र ‘अल्पसंख्यांक विकास मंत्रालय’ असते किंवा ‘सच्चर आयोग’ आदी बनवले जातात. तरी हिंदुबहुल देशात अल्पसंख्यांकाना लाभ, तर हिंदूंवर अन्याय ही स्थिती दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे. कालमहिम्यानुसार कलियुगांतर्गत सत्ययुग म्हणजेच हिंदु राष्ट्र येणार आहे. ‘जेथे धर्म तेथे असो, तेथे विजय असतो’ या धर्मवचनाप्रमाणे हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी खारीचा नाही, तर हनुमतांप्रमाणे वाटा उचलूया, असे आवाहन, सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून भक्तांच्या ताब्यात द्या आणि धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा करा ! अधिवक्ता नीलेश सांगोलकर
देशातील ‘सेक्युलर’ म्हणवून घेणारे शासन केवळ हिंदूंची मंदिरे ताब्यात घेते, तर मशिदींसाठी स्वतंत्र ‘वक्फ बोर्ड’ आणि चर्चसाठी ‘डायोसेशन सोसायटी’ असते ! हिंदूंच्या मंदिरांचा पैसा हिंदु धर्मासाठी नव्हे, तर मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यासाठी वापरला जातो. देशभरात हिंदूंच्या लाखो मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. निधर्मी शासनाचा हिंदूंच्या मंदिरात हस्तक्षेप का ? देशात धर्मांतराची मोठी समस्या हिंदूंसमोर आहे. देशातील 9 राज्यात आज हिंदू धर्मांतरित होऊन अल्पसंख्य झाले आहेत, इतकी गंभीर स्थिती आहे. या संदर्भात अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सध्या सुनावणी चालू असून सर्वोच्च न्यायालयाने ‘धर्मांतराचे सूत्र गंभीर असून याला राजकीय रंग देऊ नका’, अशी टिपण्णी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर’ आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी यावर राजकारण न करता प्रबळ इच्छाशक्ती दाखवून धर्मांतरबंदी कायदा केला पाहिजे.

12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील सोमनाथ मंदिराविषयी ‘ऑल इंडिया इमाम असोशिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी, ‘सोमनाथ मंदिरामध्ये श्रद्धा आणि देवता यांच्या नावाखाली अयोग्य गोष्टी होत आहे. मुलींना गायब केले जात आहे. गझनी याने याची माहिती घेतली असता त्याला यात तथ्य आढळल्यावर त्याने आक्रमण केले.’ अशा प्रकारचे संतापजनक विधान केले आहे. रशिदी यांनी यापूर्वीही ‘येणार्‍या 50-100 वर्षांच्या काळात श्रीराम मंदिर तोडून परत तिथे बाबरी मशिद बांधली जाईल. तेव्हा कदाचित मुस्लीम शासक असतील,’असे श्रीराम मंदिराविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. अशा प्रकारची विधाने करून जाणीवपूर्वक हिंदूंना अपकिर्ती करण्याचे षडयंत्र चालू आहे. अशांना आपण ठणकावून सांगितले पाहिजे की श्रीराम मंदिर हे यापुढील काळात जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत ते रहाणारच आहे.

उपस्थित पक्ष- संघटना- संप्रदाय – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भाजप, शिवसेना (उद्धव ठाकरे आणि शिंदे गट), विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, वारकरी संप्रदाय, सनातनचे संत पू. सदाशिव(भाऊ) परब, पू. (डॉ.) शरदिनी कोरे, शिरोली येथील ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील यांच्यासह वडणगे, शिये, शिरोली, निगवे, नांगाव, तळंदगे, पेठवडगाव, भादोले, लाटवडे, आळते, पट्टणकोडोली, हुपरी, व्हन्नूर, कोगील, सिद्धनेर्ले या गावांमधून, तर मलकापूर, कागल, करवीर या तालुक्यांमधील धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुर्ग विशाळगडचा रणसंग्राम उभारणार्‍या धर्मवीर आणि शिवप्रेमींचा सत्कार !
दुर्ग विशाळगडावरील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरवस्था यांना वाचा फोडण्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती पत्रकार परिषद, घंटानाद आंदोलन, निवेदन, मंत्रालय, तसेच विधीमंडळ अधिवेशन अशा विविध माध्यमातून हा लढा देत आहे. समितीच्या पाठपुराव्यामुळे गडावरील अतिक्रमण काढण्याचा पहिला टप्पा लवकरच चालू होत आहे. तरी हा रणसंग्राम उभारणारे सर्वश्री राजू यादव, संभाजीराव भोकरे, रणजित घरपणकर, शरद माळी, सुरेश यादव, प्रमोद सावंत, बाबासाहेब भोपळे, किशोर घाटगे यांचा सत्कार श्री. मनोज खाडये यांच्या हस्ते करण्यात आला.
याचसमवेत राष्ट्र आणि धर्म कार्य करणार्‍या विविध धर्मप्रेमींचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

१ मार्चला कोल्हापूर येथे आंदोलन

‘दख्खनचा राजा’ म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा देवस्थानच्या मालकीची 400े एकर जमीन परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात जे लोक आणि शासकीय अधिकारी सहभागी असतील, त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे नोंदवून त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश शासनाने द्यावेत, तसेच येथे वक्फ बोर्डाच्या माध्यमातून हिंदूंच्या जमिनी कह्यात घेण्याचा प्रकार चालू आहे त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी 1 मार्चला कोल्हापूर येथे आंदोलन घेण्यात येणार आहे.
विशेष

१. प्रारंभी श्री महालक्ष्मी मंदिर येथून मशाल प्रज्वलीत करून सभास्थळी आणण्यात आली.
२. रणरागिणींचा एक गट हातात भगवे झेंडे घेऊन सभास्थळी उपस्थित झाला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.