प्रतिष्ठा न्यूज

सुवर्ण भारताच्या उभारणीसाठी कॉंग्रेसचा विचार घराघरात रूजविणार : आमदार विश्वजीत कदम यांचा निर्धार; कॉंग्रेसच्या हाथ से हाथ जोडो अभियानाचा सांगलीत जोरदार प्रारंभ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रा काढल्यानंतर देशभर कॉंग्रेस पक्षासाठी अनुकुल वातावरण तयार झाले आहे. सुवर्ण भारताच्या उभारणीसाठी राहूल गांधींनी सांगितलेला सर्वसामान्य माणसांच्या विकासाचा कॉंग्रेसचा विचार घराघरात रूजविण्यात येईल, असा निर्धार कॉंग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. कॉंग्रेसच्या ‘‘हाथ से हाथ जोडो’’ अभियानाचा सांगली येथे जोरदार प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, सांगली जिल्ह्याचे प्रभारी संजय बालगुडे, सह प्रभारी अभय साळुंखे, आमदार विक्रम सावंत, महेंद्रआप्पा लाड, महिला कॉंग्रेच्या उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील, सरचिटणीस ऍड. मनिषा रोटे, भारती सहाकारी बँकेचे संचालक जितेश कदम, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मालनताई मोहिते, सुवर्णा पवार, कॉंग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांच्यासह जिल्हाभरातून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विश्वजीत कदम म्हणाले, उन, वारा, पाऊस याबरोबरच अनेक अडथळ्यांवर मात करत कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रा पूर्ण केली आहे. देशभरातील सामान्य माणसांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी अश्‍वासीत केले आहे. हुकूमशाहीच्या दिशेने जाणार्‍या सरकार विरोधात जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे येणारा काळा हा कॉंग्रेसचा असेल. कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचा विचार घरा घरात पोहचविण्यासाठी जीवाचे रान केले पाहिजे. ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाच्या माध्यमातून देशाला सामाजिक, आर्थिक आणि वैज्ञानिक उंचीवर नेण्याचे उद्दीष्ट आहे. कॉंग्रेच्या हाताला जनतेचा हात जोडून सुवर्ण भारताच्या उभारणीत सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा, या राहूल गांधींच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा. असे आवाहन विश्वजीत कदम यांनी केले. तसेच आज जाहिर झालेला अर्थसंकल्प सर्व सामान्यांच्या हिताचा नसून मोठ्या उद्योजकांच्या विकासाचा छुपा अजेंडा राबविणारा आहे. अशी टिका त्यांनी केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.