प्रतिष्ठा न्यूज

मराठा आरक्षण सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणी प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा सेवा संघाने पुकारलेल्या सावळज बंदला नागरिकांतून उस्फुर्त प्रतिसाद

दिवसभर कडकडीत बंद : मराठा समाजाकडून निषेध

प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज प्रतिनिधी : सावळज (ता. तासगाव) येथील मराठा सेवा संघाकडून मराठा आरक्षण सगे सोयरे अध्यादेश अंमलबजावणीच्या मागणीसाठी (बुधवारी) बंद पुकारण्यात आला होता. या बंदला सावळज गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवारी दिवसभर गावातील संपूर्ण व्यवहार कडकडीत पणे बंद होते.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे मराठा समाजाला आरक्षण व सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येती खालावत आहे. सरकारने मागच्या महिन्यात मुंबईतील आंदोलनाच्या वेळी कुणबी नोंदी सापडलेले व सगे सोयऱ्याना प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केली होती. परंतु त्या अध्यादेशाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पुकारण्यात आला होता.

दरम्यान तासगाव तालुक्यातील सावळज येथे मराठा सेवा संघाकडून मराठा आरक्षण व सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी सावळज बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला नागरिकांनी व व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी सिद्धेश्वर मंदिरासमोर मराठी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. प्रशासनाच्या मुजोर कारभाराच्या विरोधात तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बहुसंख्येने मराठा समाजातील युवक व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.