रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने पोलीस अंमलदारांचे आरोग्य शिबीर संपन्न
प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 13 : रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दलाच्या मोटर परिवहन विभागातील पोलीस अंमलदारांचे आरोग्य शिबीर न्यू लाईफ ICU व मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, विश्रामबाग, सांगली यांच्या वतीने घेण्यात आले. शिबीराचे उद्घाटन पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) डॅनियल बेन व पोलीस निरीक्षक सचिन दंताळ यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबीरामध्ये जिल्ह्यातील 182 चालक पोलीस अंमलदारांची वैद्यकिय आणि नेत्र तपासणी केली. या शिबीरामध्ये डॉ. रविराज कांबळे, डॉ. अभिमान पवार, डॉ. आकाश जैन, डॉ. सुरेश वाघ, डॉ. राहूल विसापुरे, डॉ. विक्रम कोळेकर या तज्ञांनी मार्गदर्शन व मोफत सेवा दिली. ECG, हिमोग्लोबीन, रक्तातील साखर, ब्लड प्रेशर, ऑक्सीजन, हाडामधील कॅल्शीअम तसेच डोळ्यांची तपासणी करुन मोफत सल्ला व औषधोपचार केले. यावेळी डॉ. पवार यांनी पोटविकार या विषयावर व्याख्यान दिले.