प्रतिष्ठा न्यूज

निमणी विकास सोसायटी माजी चेअरमन यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : निमणी येथील प्रकाश पाणीपुरवठा या संस्थेच्या बेकायदेशीर गोडाऊन बांधकामाची तसेच जय हनुमान विकास सोसायटी निमणी या संस्थेच्या नियोजित गोडाऊन बांधकामाच्या जागेची पाहणी करण्याकरता तहसीलदार तासगाव यांच्या आदेशानुसार गाव कामगार तलाठी राजाराम कारंडे हे सोमवारी सकाळी १० वाजता बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आले होते.
यावेळी जमिनीचे मूळ मालक व ज्यांच्या नावावर विक्री परवानगी मिळालेली आहे ते बाळासाहेब पाटील माजी चेअरमन निमणी विकास सोसायटी हे गाव कामगार तलाठी यांना संबंधित क्षेत्राच्या खरेदी-विक्रीची कागदपत्रे दाखवत असताना त्या ठिकाणी प्रकाश पाणीपुरवठा संस्थेचे अपात्र संचालक जगन्नाथ मस्के हे आले व त्यांनी बाळासाहेब पाटील यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तसेच तुझा काय संबंध आहे ? तू इथून निघून जा असे म्हणून त्यांना धक्काबुक्की केली.यावेळी निमणीचे पोलीस पाटील श्री सतीश अशोक पाटील यांनी मध्यस्थी करत दोघांचा वाद मिटवला व बाळासाहेब पाटील यांना त्या ठिकाणावरून जाण्याची विनंती केली.या संदर्भात बाळासाहेब पाटील यांनी तासगाव पोलीस स्टेशन येथे रितसर फिर्याद नोंद केली आहे.
जय हनुमान विकास सोसायटीने खोटी कागदपत्रे जोडून जिल्हा मध्यवर्ती बँकेला फसविण्याचा प्रयत्न केला आहे तो उघडकीस आणला याचा राग मनात धरून मस्के यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.दोन्ही संस्थाने त्या ठिकाणी कायदेशीर परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही बांधकाम करू नये सुरू असलेले बांधकाम स्थगित करावे असे आदेश सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तासगाव यांनी दिले आहेत.तहसीलदार तासगाव यांनाही खोटी कागदपत्रे दाखवून संस्थेने सदर जागेच्या  सद्यस्थितीचा पंचनामा करण्याची मागणी केली होती त्याप्रमाणे पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होती.
Show quoted text
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.