प्रतिष्ठा न्यूज

तासगावात नरवीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी साजरी..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : किल्ले पन्हाळा गडाला सिद्दी जोहरने घातलेल्या वेढ्यातून छत्रपती श्री शिवाजी महाराजांना बाहेर काढण्यासाठी प्रति शिवाजी बनून स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणारे नाभिक समाजाचे रत्न नरवीर शिवा काशीद यांची ३६४ वी पुण्यतिथी तासगाव येथे साजरी करण्यात आली.
येथील संत सेना सेवा संघ व नाभिक समाजाच्या वतीने संत सेना मंदिरात वीर शिवा काशीद पुण्यतिथी साजरी करण्यात आली.पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या हस्ते वीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी त्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेत अनेक मावळ्यांनी योगदान दिले,असून त्यामध्ये वीर शिवा काशीद,जिवा महाले यांचे योगदान विसरता येणार नाही,युवकांनी शिवचरित्र अभ्यासावे असे आवाहन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस हे.कॉ. अभिजीत गायकवाड होते.तर पो.हे.कॉ.सचिन कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.स्वागत व प्रास्ताविक  करत दत्तात्रय सपकाळ यांनीही वीर शिवा काशीद यांच्या पराक्रमाची माहिती दिली.संत सेना सेवा संघाचे अध्यक्ष रोहित गायकवाड यांनी आभार मानले.कार्यक्रमास प्रभाकर गायकवाड,सुदाम खंडागळे,सोपान गायकवाड,बाळासाहेब जाधव,नागेंद्र गायकवाड,विनायक गायकवाड, प्रशांत गायकवाड,सुनील गायकवाड, रमेश गायकवाड,गोरख गायकवाड आदी समाज बांधव उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.