सांगली : कोविड कालावधीत रुग्णांना मोफत सेवा बजावणाऱ्या मनपाक्षेत्रातील कोविड सेंटरचा महापालिकेकडून सत्कार
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगपालिकेच्या 25 वया वर्धापन दिनानिमित्त कोविड काळात मोफत सेवा देणाऱ्या कोवीड सेंटर चालकांचा महापालिकेकडून सत्कार करण्यात आला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन सात संस्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभागृह नेत्या भारती दिगडे, विरोधीपक्षनेते संजय मेंढे, समाज कल्याण सभापती अनिता व्हनखंडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये स्वामी विवेकानंद सेंटर सांगली, सहकार फोंडेशन मिरज, जिल्हा क्रीडा संकुल मिरज, स्व. डॉ. पतंगराव कदम कोविड् सेंटर, आरोग्य विश्व कोविड् सेंटर, पंडित दीन दयाळ उपाध्याय कोविड् सेंटर आणि कुपवाड कोविड सेंटर या सात कोविड सेंटर चालकांचा सत्कार करण्यात आला.