प्रतिष्ठा न्यूज

तासगाव शहराची सुरक्षा वाऱ्यावर : शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद दुरुस्ती बाबत प्रशासनाची उदासीनता.

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : नागरिकांच्या सुरक्षेसाठी व अनुचित प्रकार रोखण्या साठी तासगाव शहरात बसवण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने *असून अडचण आणि नसून खोळंबा* असे चित्र सध्या दिसत आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून बसवण्यात आलेले सीसी टीव्ही कॅमेरे गेल्या अनेक दिवसां पासून बंद स्तिथीत आहेत,याबाबत नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यात गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.एखादी अनुचित घटना घडल्यानंतर ज्यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पडताळणी केली जाते तेव्हा संबंधित सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचे लक्षात येत आहे.यातून कॅमेरे दुरुस्ती बाबत प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी नगरपालिकेसह पोलिस विभागाने गाजावाजा करीत शहरातील मुख्य चौकात व रस्त्यांवर बसवलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत.संपूर्ण शहराकडे लक्ष ठेवणाऱ्या या डोळ्यांना मोतीबिंदू झाला असून,नेमके ऑपरेशन करणार कोण या वादात शहर आंधळ झाले आहे.नगरपालिकेने शहरातील महत्त्वाच्या सर्वच चौकात बसविलेले सीसी कॅमेरे देखभाल दुरूस्तीअभावी बंद पडले आहेत.कॅमेरे दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणाची यावरून वाद असल्याचे दिसून येत आहे.नगरपालिकेने चार वर्षांपूर्वी शहरातील महत्त्वाच्या चौकात सीसी कॅमेरे बसविले आहेत.हे कॅमेरे बसवून सर्व यंत्रणा पोलिसांकडे हस्तांतरित केली असल्याचे नगरपालिका प्रशासन सांगत आहे,त्यामुळे या कॅमेऱ्यावर पोलिसांची निगराणी आहे.या कॅमेऱ्यावरून वाहतुकीची शिस्त बिघडविणाऱ्यांना दंडात्मक कारवाई केली जात आहे.असे असताना कॅमेऱ्यांची देखभाल व दुरुस्तीबाबत अनास्था दाखविली जात असून शहरातील बहुतांश कॅमेरे हे बंद पडल्यामुळे झालेला हा खर्च व्यर्थ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यामुळे संबधीत यंत्रणानी बंद असलेल्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची तातडीने दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.