प्रतिष्ठा न्यूज

रविवारी तासगावात निरंकारी मिशनतर्फे भव्य रक्तदान शिबीर

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगावचे संत निरंकारी चॅरीटेबल फॉउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीहि उद्या रविवारी भव्य रक्तदान शिबिराचें आयोजन करण्यात आले आहे.रक्त संकलन वसंतदादा पाटील शासकीय ब्लड बँक सांगली यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवनी प्रमाणे देशभरात प्रत्येक शहरात रक्तदान शिबिराचें आयोजन केले जाते. रक्तदान शिबीर संत निरंकारी सत्संग भवन तासगाव या ठिकाणी सकाळी 8 तें 5 या वेळेत आयोजित केले आहे.शिबिरा दरम्यान 11 तें 1 या वेळेमध्ये कोल्हापूर झोनचें इन्चार्ज अमरलाल निरंकारीजी यांच्या उपस्थितीत सत्संग सोहळा होणार आहे. या शिबिराच्या उदघाटनासाठी तहसीलदार रवींद्र रांजणे साहेब व पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले साहेब उपस्थित राहणार आहेत.या मानवतेच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक दत्तात्रय जगताप व मुखी अप्पासाहेब कदम यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.