प्रतिष्ठा न्यूज

गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात फिजिओथेरपी काॅलेजच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
मिरज दि. ७ : गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या फिजिओथेरपी काॅलेजच्या प्रथम वर्षाच्या ६० विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे डॉ. संदीप पाटील यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत समारंभ संपन्न झाला. संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील व विश्वस्त विरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा समारंभ पार पडला.
संस्थेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी स्व. गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  दिपप्रज्वलन करण्यात आले.
प्राचार्या डॉ. आकांक्षा जोशी यांनी फिजिओथेरपीचे महत्त्व, स्पेशालिटीज, उपचार पध्दती, अभ्यासक्रम इ. बाबत नवागत विद्यार्थी व पालक यांचे प्रबोधन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. संदीप पाटील यांनी फिजिओथेरपी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पृथ्वीराज पाटील यांनी फिजिओथेरपी काॅलेजच्या माध्यमातून सर्वोत्तम करिअर करण्याची संधी दिली आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग करून चांगले तज्ञ फिजिओथेरपीस्ट बना, फिजिओथेरपी क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधन, उपचार पध्दती यांचा अभ्यास करून सर्वोत्तम गुणांची कमाई करुन आदर्श फिजिओथेरपीस्ट म्हणून उत्कृष्ट आरोग्य सेवा करुन रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवा, काॅलेजची शिस्त पाळा, सर्व तासांना उपस्थित राहून भरपूर अभ्यास करा.. कठोर मेहनत करुन यश खेचून आणा आणि पालक व काॅलेजचा नावलौकिक करा असे आवाहन केले.
फिजिओथेरपी व्याख्याता डॉ. प्रणव देशमुख यांनी काॅलेजचे नियम व शिस्तपालन याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी शिक्षक व नवागत विद्यार्थ्यांनी परिचय करुन दिला. डॉ. अनमोल सोनावणे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
या स्वागत समारंभात प्रथम वर्षाचे नवागत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
एका सर्व सुविधायुक्त गुणवत्तायुक्त चांगल्या फिजिओथेरपी काॅलेजमध्ये पाल्याला प्रवेश मिळाल्याचे समाधान पालक व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.