प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या मुरूम माफियांचे अनेक कारनामे : मनसे नेते अमोल काळे

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : ढवळी येथील गायरान जमिनित गेल्या अनेक दिवसापासून तासगाव येथील एकाने सर्व महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून  बेकायदेशीरपने मुरूम उपसा मोठ्या प्रमाणात केला आहे.याबाबत गावातील महसूल कर्मचारी  यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
यात त्यांचा सहभाग आहे काय? अशी शंका गावकरी उपस्थित करतं आहेत.जमिनीमधील मुरूम अवैधरीत्या उत्खनन करून बाहेर विकला जात असताना सर्वच अधिकारी डोळेझाक करताना दिसून येत आहेत.त्या मुरूम माफिया वर  त्वरित कारवाई करावी अशी मागणी ढवळी चे मनसे नेते अमोल काळे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी बोलताना काळे म्हणाले की सदर व्यक्तीचे महसुल विभागाच्या बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या बरोबर अर्थिक लागेबांधे आहेत.त्यामुळे महसूल कर्मचारी (गाव कामगार तलाठी व मंडल अधिकारी) यांच्या कडून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही.सदर व्यक्तीने  मुरूम उत्खनन करताना नियमाचे पालन केलेले नाही.तसेच महावितरणाच्या पोलच्या अगदी ५ ते १० फूट अंतरावर मुरूम उत्खनन करून बाहेर विकला आहे.तरी आपण याबाबत तातडीने पंचनामा करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी विनंती तहसीलदार यांना केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.