प्रतिष्ठा न्यूज

शेतकरी, कष्टकरी, कामगार , सामान्य वर्गातील युवक यांच्या परिश्रमातून गुणवत्तेचे दर्शन घडते. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून देशाची सेवा करावी : सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती सोम्या शर्मा

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड/ शंकरनगर दि.2 : शंकरनगर ता. बिलोली सारख्या ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक सुविधा निर्माण होत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. विद्यार्थ्यांच्या परिश्रमातून गुणवत्तेचे दर्शन घडते .या विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान आहे. त्याच प्रमाणे शेतकरी, कष्टकरी, सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून; मेहनत, जिद्द याच्या बळावर कलेक्टर (आय.ए.एस) अधिकारी व्हावे असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती सोम्या शर्मा यांनी केले. त्या आज दि. 2 आगस्ट रोजी भास्करराव बापूराव पाटील खतगावकर पब्लिक स्कूल, ज्यु काॅलेज, शंकरनगर ता. बिलोली येथे विद्यार्थी- पालक मेळाव्यात बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमात बोलताना जि. प. सदस्या डॉ. मिनलताई पाटील खतगावकर म्हणाल्या की, मानार पब्लिक स्कूल, ज्यु काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात गरूड भरारी घेतली आहे. शाळेतील विद्यार्थी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, शिक्षक, पोलिस, विविध क्षेत्रात कार्यरत असल्याबद्दल त्यांनी गौरव उदगार काढले.
डॉ. मिनलताई पाटील यांनी अस्खलित इंग्रजी भाषेत अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी श्री बाळासाहेब पाटील, जि. प. सदस्या डॉ मिनलताई पाटील खतगावकर, श्री दुर्गाप्रसाद पांडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी श्री सचिन गिरी, सहायक आयुक्त डॉ.तेजस माळवतकर, सह पोलिस निरीक्षक श्री संकेत दिघे गटशिक्षणाधिकारी एम. बी. पाटील, युवक काँग्रेस चे युवा नेते श्री रवी पाटील खतगावकर, आदिजण उपस्थित होते.
यावेळी मान्यवर व्यक्तींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा चषक, प्रमाणात देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री आर. के. सुर्यवंशी सर यांनी केले तर उर्मिला तोडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. यावेळी परिसरातील शेकडो पालक- विद्यार्थ्यी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.