प्रतिष्ठा न्यूज

स्वाभिमानीच्या शिवार प्रदर्शनास प्रचंड प्रतिसाद… सलग दहाव्या वर्षी विनामूल्य प्रवेश

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटना व क्रांतीसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार पासून सुरु झालेल्या शिवार कृषी प्रदर्शनास तासगावसह सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.गेल्या नऊ वर्षापासून भरवण्यात आलेल्या कृषि प्रदर्शनातं कोणतेही शुल्क न आकारता सर्वांनाच मोफत प्रवेश दिला गेला असून याहीवर्षी हें प्रदर्शन सर्वासाठी मोफत आहे.15 तारखेला श्वानप्रेमी साठी डॉग शो झाला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 16 तारखेला पशु प्रदर्शन पार पडले.जगाच्या बाजारपेठेत काय सुरु आहे हें शेतकऱ्यांना समजले पाहिजे,आपल्या शेतात काय पिकवले पाहिजे,जगाला कशाची गरज आहे हें शेतकऱ्यांना,तळागाळातील लोकांना कळावे, नव्या तंत्रज्ञानाचा लाभ त्यांना व्हावा हाच मुख्य उद्देश ठेऊन शिवार चें आयोजन केले असल्याचें आयोजक महेश खराडे यांनी यावेळी सांगितले.तासगावची द्राक्षे व बेदाणा जगाच्या बाजार पेठेत दिसतात मात्र त्यास तंत्रज्ञानाची जोड मिळावी,यासाठीच हें प्रदर्शन असल्याचे दिसून येत आहे.या प्रदर्शनातं अडीचशे तें तीनशे स्टॉल असून या प्रदर्शनातं पशु पक्षी प्रदर्शन, तांदूळ महोत्सव,शेतकरी बाजार, कडधान्य महोत्सवास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.यात शेती औषध नामवंत कंपन्यासह अवजारे, बियाणे,खते,ट्रॅक्टरसह अनेक नामांकित कंपन्याचे स्टॉल आहेत.आज सोमवारी या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून शेतकरी बांधवानी या प्रदर्शनास भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन महेश खराडे यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.