प्रतिष्ठा न्यूज

आदिवासी पारधी व भटकेविमुक्त समाजातील कलाकार व प्रतिभावंतांना संधी, मार्गदर्शन व शिक्षणाची आवश्यकता : शेखर बापू रणखांबे ; तासगाव येथे रेखा फिल्मच्या पुरस्कारप्राप्त अभिनेत्री माया पवार यांचा सत्कार

प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : आदिवासी पारधी व भटकेविमुक्त समाजात अनेक उत्तमोत्तम गुणवान कलाकार व प्रतिभावंत आहेत, परंतु त्यांना योग्य संधी, मार्गदर्शन व शिक्षणाची आवश्यकता असल्याचे इफ्फी पुरस्कार प्राप्त रेखा या लघुपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी सांगितले.ते तासगाव जि.सांगली येथे तासगाव तालुका पारधी समाज संघटनेच्या वतीने रेखा फिल्मच्या पुरस्कारप्राप्त अभिनेत्री माया पवार यांच्या सत्काराप्रसंगी बोलत होते.यावेळी लघुपटातील कलाकार, तंत्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व तमाशा कलावंत भास्कर सदाकळे, पत्रकार कुलदिप देवकुळे, नृत्य दिग्दर्शक सुमीत साळुंखे, सुरज वाघमोडे, ॲड. गजानन खुजट, सामाजिक कार्यकर्ते अनिल धोत्रे,राजु वाटकर आदिंनी विचार व्यक्त केले. यामध्ये त्यांनी अभिनेत्री माया पवार यांच्या अभिनयाचे कौतुक केले, तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व समाजातील समस्यांवर चर्चा केली.
या लघुपटामध्ये उपेक्षित व वंचित समुहातील पारधी जमातीच्या माया पवार व तनीशा पवार या दोन्ही भगिनींनी भुमिका साकारली आहे.या दोन्ही निरक्षर व अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण व अनुभव नसतानाही जी प्रतिभा दाखवली तिची दखल इफ्फी या गोवा येथे पार पडलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये घेतली आहे.यामुळे माया पवार बरोबरच पारधी समाजाचा नावलौकिक वाढला आहे.तसेच या समाजातील काही मुलभूत प्रश्न ऐरणीवर आले आहेत.सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी
शिक्षण, उपजिवीका, निवारा व मानवी अधिकाराचे प्रश्न यावेळी सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
तासगाव येथील इंदिरानगर येथील वसाहतीमध्ये हा सत्काराचा कार्यक्रम पार पडला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अॅड. गजानन खुजट,शा.चंद्रकांत गायकवाड, समाजसेवक कॉ.राजू वाटकर,कवियत्री संजिवनी पवार,राहीन पवार, अनिल चव्हाण,जगणू पवार, चरणदास पवार व तासगाव तालुक्यातील पारधी समाजबांधव उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.