प्रतिष्ठा न्यूज

उमरा ग्रामपंचायतीच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबीर

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
उमरा:- लोहा तालुक्यातील उमरा येथील सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना व त्यांचा कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी वय वर्ष 10 च्या पुढील लोकांची आरोग्य तपासणी शिबिर दि.17 जून 2023 रोज शनीवारी सकाळी 10:00 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात होणार आहे. यामध्ये खालील तपासण्या करण्यात येणार आहेत.
1) फुफ्फुसाची कार्यक्षमता चाचणी, 2) ऑडियन स्क्रीनिंग टेस्ट (शुद्ध टोन ऑडिओग्राम), 3) दृष्टी स्क्रीनिंग चाचणी, 4) सी.बी.सी. चाचणी, 5) रक्तातील साखरेची चाचणी (उपवास आणि पीपी), 6) यकृत कार्य चाचण्या, 7) रेनल (मूत्रपिंड) कार्य चाचण्या, 8) लिपिड प्रोफाइल, 9) मलेरिया परजिवी, 10) ESR, 11) T3 T4 TSH, 12) सिरम लोह, 13) GGTP, 14) मॅग्नेशियम इत्यादी.
रक्त तपासणी चाचणी पुर्णपणे मोफत आहे. याच बरोबर कान व डोळ्यांची कमजोरी तपासणी पुर्ण पणे निःशुल्क असणार आहे.यासाठी नोंदणी कृत बांधकाम कामगार आसने आवश्यक आहे. सदर शिबिरात सहभागी होऊन सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन उमरा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत असून यासाठी सोबत – 1) आधार कार्ड, 2) बांधकाम कामगार नोंदणी पावती किंवा बांधकाम कामगार कार्ड हे आसने आवश्यक आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.