प्रतिष्ठा न्यूज

आषाढी एकादशी पंढरपूर यात्रे निमित्त नांदेड विभागातून सहा विशेष रेल्वे- दक्षिण मध्ये रेल्वे विभागाची माहिती

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : आषाढी एकादशी निमित्त नांदेड विभागातून पंढरपूरसाठी सहा विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्ये रेल्वे विभागाने घेतला आहे. दक्षिण मध्ये रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनूसार नांदेड, जालना, छत्रपती संभाजी नगर आणि आदिलाबाद येथून ह्या रेल्वे गाड्या धावणार आहेत.
नांदेड विशेष रेल्वे दि.28 जून 2023 रोजी सकाळी 8 वाजता नांदेड रेल्वे स्टेशन येथून पंढरपूरसाठी सुटेल. जालना पंढरपूर विशेष रेल्वे दि.27 जून 2023 रोजी रात्री 7 वाजून 20 मिनिटांनी जालना येथून सुटेल. छत्रपती संभाजी नगर येथून विशेष रेल्वे दि.28 जून 2023 रोजी तर पंढरपूर ते छत्रपती संभाजी नगर दि.29 जून 2023 रोजी पंढरपूर येथून सुटेल. आदिलाबाद ते पंढरपूर ही विशेष रेल्वे गाडी दि.28 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता आदिलाबाद येथून सुटणार आहे अशी माहिती दक्षिण मध्ये रेल्वे विभागाने दिली आहे.
पंढरीच्या रस्त्यांवरील भिंती झाल्या बोलक्या
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर “स्वच्छ भारत अभियान” आणि “माझी वसुंधरा” संकल्पनेतून पंढरपूरात रस्त्यावरील भिंतीवर वेगवेगळ्या साधू संतांचे बोलकी चित्र आणि पोट्रेट पालिकेच्या माध्यमातून साकारण्यात आली आहेत.भिंतीवरील साधू संतांची बोलकी चित्रे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पंढरपूर शहरातील ठाकरे चौक ते केबीपी कॉलेज दरम्यान नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या भिंतीवर संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज संत जनाबाई या साधू संतांसह आषाढी पालखी सोहळ्याचे आकर्षक अशी रंगीबेरंगी चित्रे साकारण्यात आली आहेत. या निमित्ताने आषाढी यात्रेतील स्वच्छते बरोबरच पर्यावरण संतुलन आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे. एक किलोमीटर रस्त्याच्या बाजूला असलेल्या भितींवर प्रथमच सामाजिक संदेश देणारी चित्रे साकारण्यात आली आहेत. या चित्रांमुळे रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.पंढरपूर पालिकेच्या या उपक्रमाचे भाविकांनी स्वागत केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.