प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील शेख बंधूनी किल्लीतील गणपती साकारत जोपासली एकात्मता

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गणेशोत्सवामध्ये अनेक नवनवीन गोष्टी आपण ऐकल्या आहेत मात्र गणरायाचे भक्त असणाऱ्या सांगलीतील शेख बंधूनी किल्ली गणपती साकारला आहे. गणपतीची किल्ली बनवत शेख कुटुंबाने सामाजिक सद्भावना कायम ठेवली आहे. शेख कुटुंबाने बनवलेला किल्ली गणपती पाहण्यासाठी सांगलीकर गर्दी करत आहेत.
सांगलीतील मेनरोडवर शेख कुटुंबाचे एवन चावी नावाचे कुलूप किल्ली बनवण्याचा व्यवसाय आहे. वेगवेगळ्या सण उत्सवात शेख कुटुंबाकडून त्या त्या सण उत्सवाचे महत्व जोपासणाऱ्या किल्ल्या बनवल्या जातात. यापूर्वी शेख कुटुंबांनी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा छत्रपती शाहू महाराज तसेच सर्व जाती धर्माच्या बोधचिन्हांच्या प्रतिकृतीच्या किल्ल्या बनवल्या आहेत. गणपती उत्सवाचे औचित साधत अकबर शेख, वाहिद शेख, अहमद शेख या शेख बंधूनी गणपतीची
किल्ली तयार केली आहे. हुबेहूब गणपती बाप्पाचा छाप असणाऱ्या किल्ल्या तयार केल्या आहेत. आतापर्यंत 100 हुन जास्त किल्ल्या या शेख बंधूनी तयार केल्या असून किल्लीतील गणपती पाहायला शेख बंधूंच्या एवन चावी दुकानात सांगलीकर गर्दी करत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.