बातमी संस्कार भारती सांगलीचा रविवारी पुरस्कार सोहळा
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : संस्कार भारती सांगली समिती चा 30 वा वर्धापनदिन रविवार दि.9आॅक्टोबर 2022रोजी खरे मंगल कार्यालय, विश्रामबाग,येथे संध्याकाळी पाच वाजता संपन्न होत आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नाट्य सिने अभिनेते श्री.अविनाश नारकर हे उपस्थित राहणार आहेत.प्रतिवर्षाप्रमाणे यावेळी संस्कार भारती कडून युवा गायक कलाकार व साथीदार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.युवा गायक श्री.श्रीरंग जोशी व तबलावादक श्री.विवेक पोतदार यावर्षीचे पुरस्कार मानकरी आहेत. तसेच शाहिरी कलावंत श्री.पृथ्वीराज माळी व माधवी माळी यांचाही त्यांच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे.तरी सर्वांनी या कार्यक्रमास हजर रहावे असे आवाहन संस्कार भारतीकडून करण्यात आले आहे.