प्रतिष्ठा न्यूज

रामभक्तांनो अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मुर्तीसाठी दोन धागे विणा: माजी आमदार नितीन शिंदे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : अयोध्यातील ऐतिहासिक वैभवशाली राम मंदिरातील रामरायासाठी व इतर मूर्तींसाठी वस्त्र विणन्याचा “दो धागे श्रीराम के लिए” हा अभिनव उपक्रम हेरिटेज या हातमाग विणणाऱ्या लोकांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थेने संस्थेच्या संचालिका सौ. अनघा घैसास यांच्या पुढाकाराने व प्रयत्नाने श्री राम मंदिर न्यासाच्या आशीर्वादाने पुण्यामध्ये सुरू झाला असून दिनांक 10 डिसेंबर ते दिनांक 22 डिसेंबर 2023 या काळात पुण्यात सुरु आहे. संपूर्ण देशभरातील श्री राम भक्त त्याठिकाणी येऊन धीगे विणत आहेत. ही वस्त्रे शेवटच्या दिवशी न्यासाला सुपुर्त केली जातील व त्यातून रामरायांसाठी विविध वस्त्रे शिवली जातील. या अभिनव उपक्रमात आज हिदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे व भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस ॲड. स्वाती शिंदे यांनी उपस्थित राहून धागे विणले.

यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या लढ्यामध्ये श्रीराम पादुका पूजन श्रीराम शिलापूजन व श्री राम रथयात्रा यामध्ये सहभागी व्हायचे भाग्य मला यापूर्वी लाभले तसेच आज अयोध्येत उभारत असलेल्या श्रीराम मंदिरा मधील प्रभू श्रीराम लल्लाच्या मूर्तीच्या वस्त्रासाठी धागा विणण्याचे भाग्य मला मिळाले. तरी श्रीराम भक्तांनी या उपक्रमात येऊन आपल्या हाताने प्रभू श्रीरामाकरीता दोन धागे विणावेत असे आवाहन माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले.

यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस ॲड. स्वाती शिंदे, रा. स्व. संघाचे विनयजी पत्राळे, स्वाती भिडे, चेतन भोसले, पंकज कुबडे उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.