प्रतिष्ठा न्यूज

स्वच्छता ही सेवा अंतर्गत मनपा क्षेत्रातील सांगली स्टँड ते मिरज छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सर्व रस्ते, व परिसर आयुक्तांच्या सहभागाने स्वच्छ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सुनील पवार आयुक्त तथा प्रशासक ,मनपा अति आयुक्त ,उप आयुक्त यांच्या सह एक हजार कर्मचारी ,अधिकारी, सेवाभावी संस्था, यांच्या सहभागाने आज दि १६/१२/२०२३ रोजी महापालिका क्षेत्रातील st स्टँड ते मनपा तसेच टिळक चौक ते सांगली मिरज रोड स्वच्छता करण्यात आली,

तसेच सांगली मिरज रोड ,महात्मा गांधीचौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मिरज सर्व रस्ते, व परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे,

स्वच्छता मोहीम सकाळी ७-३० ते १०-०० वेळेत करण्यात आली आहे,

मा सुनील पवार यांनी यावेळी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आणि सेवाभावी संस्था आवाहन केले की , महापालिका स्वच्छता ही सेवा अंतर्गत 15 दिवसात एक दिवस स्वच्छता अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणें स्वच्छतेची व्यापक मोहीम राबविली जात असते, या मध्ये आपला सहभाग जास्त संख्येने उपस्थित राहून नोंदवावा , आणि स्वच्छता मोहीम यशस्वी होण्यासाठी साथ द्यावी ,
स्वच्छता मोहीम मध्ये उप आयुक्त राहुल रोकडे , वैभव साबळे , सहा आयुक्त प्रभाग समिती 1 ते 4 आणि सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.