प्रतिष्ठा न्यूज

माळकौठ्याच्या साईनाथ ची महाराष्ट्राच्या रग्बी संघात निवड : नांदेड जिल्ह्याचा नावलौकिक

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : जनजातीय खेल महोत्सव २०२३, भुवनेश्वर करिता महाराष्ट्र  पुरुष व महिला रग्बी  संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेकरिता रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व पालघर जिल्हा रग्बी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने कॉम्रेड. ल. शि कोम माध्यमिक विद्यालय व कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, उधावा, ता. तलासरी जि. पालघर येथे दि. १ जुन ते ४ जुन २०२३ दरम्यान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते  या निवड चाचणी मध्ये अनेक मुलांमधून आपल्या नांदेड जिल्ह्याचा माळकौठा  ता. मुदखेड  येथील सीनियर रग्बी खेळाडू
*साईनाथ अंताजी दंतलवाड* या खेळाडूची महाराष्ट्र संघात निवड  करण्यात आली असुन जनजातिय खेळ मोहोत्सव २०२३ भारत सरकार संस्कृती मंत्रालय नवी दिल्ली व कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस(KISS -DU) भुवनेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच खेलो इंडिया रुरल अँड इंडीजीनियस गेम्स २०२३(KIRING २०२३) व आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दि. ९ जून ते १२ जून २०२३ दरम्यान ओडिशा येथे आयोजित केले आहे. ह्या स्पर्धेकरीता महाराष्ट्राच्या पुरुष रग्बी संघात नांदेड जिल्ह्यातील साईनाथ अंताजी दंतलवाड या खेळाडूंची निवड  झाल्याबद्दल  त्याचे  सार्वत्रिक कौतुक केले जात आहे  तसेच नांदेड जिल्हा हौशी रग्बी  असोसिएशन या संघटनेचे सचिव प्रलोभ कुलकर्णी, नांदेड जिल्ह्याचे  रग्बी  प्रशिक्षक बालाजी गाडेकर भोकर,  विष्णू पूर्ने संघटनेचे पदाधिकारी, तसेच पोलीस दलातील राष्ट्रीय ॲथलेटिक्स खेळाडू तथा प्रशिक्षक शेख शब्बीर धर्माबाद,  सायकलिंग असोसिएशनचे मुख्य ज्ञानेश्वर सोनसले, ॲथलेटिक्स कोच वैभव दमकोडवार, संतोष आणेराव, गोविंद पांचाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, किशोर पाठक, महाविद्यालयाचे प्राचार्य, मित्र मंडळी, गावकरी मंडळी आदी लोकांनी कौतुक केले व  त्याचे अभिनंदन केले
आदिवासी या क्षेत्रातील आपल्या जिल्ह्यातील सीनियर गटातील पहिला राष्ट्रीय खेळाडू बनला आहे या खेळाडूला आपल्या सर्वांतर्फे  तसेच सर्व राष्ट्रीय रग्बी खेळाडू नांदेड तर्फे मनःपूर्वक राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
साईनाथ दंतलवाड हा एका ग्रामीण भागातील उत्कृष्ट अभ्यासू  खेळाडू असून तो भुवनेश्वर ओडिसा राज्य येथे आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.