प्रतिष्ठा न्यूज

मुक्ताबाई पाटील उमरेकर यांचे निधन : शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

प्रतिष्ठा न्युज /वसंत सिरसाट
नांदेड- लोहा तालुक्यातील उमरा येथील जेष्ठ महिला मुक्ताबाई दाजीराव पाटील उमरेकर वय 73 यांचे दि.22 मार्च 2024 रोजी सायंकाळी-7:00 वाजता अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर दि.23 मार्च रोजी दुपारी- 2:00 वाजता उमरा येथील त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै. मुक्ताबाई पाटील या अत्यंत प्रेमळ व धार्मिक वृत्तीच्या होत्या त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यांचे पश्चात- पती, तीन मुले, एक मुलगी, तीन सुना, नातू असा मोठा परिवार आहे.
त्या सेवानिवृत अभियंता- दाजीराव गोविंदराव पाटील उमरेकर यांच्या पत्नी तर श्रीकांत उमरेकर, उमाकांत उमरेकर, रविकांत उमरेकर, अर्चना भारसावडे यांच्या त्या आई होत. त्यांच्या अंत्यसंस्काराला सामाजिक, राजकीय, शासकीय, व व्यापारी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.