प्रतिष्ठा न्यूज

शिवरायांच्या विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणावर घाव घालण्याची हीच वेळ आहे. यासाठी सर्व हिंदू बांधवांनी एकत्रित यावे : माजी आमदार नितीन शिंदे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आज लो. टिळक स्मारक मंदिर येथे सांगली जिल्ह्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्यावतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणाविरोधात विशाळगड मुक्ती आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आलं. हा मेळावा विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे व भाजपाचे युवा नेते पै. गौतमभैय्या पवार, शिवप्रतिष्ठानचे हनमंतराव पवार, हिंदू एकता आंदोलनाचे विष्णुपंत पाटील, राष्ट्रीय स्वयं संघाचे राजेश देशमाने यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला.

यावेळी छ. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून आंदोलनाच्या स्फूर्ती मशालीचे दीपप्रज्वलन करण्यात आले. त्याच बरोबर नरवीर बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच हिंदू एकता आंदोलनाचे संस्थापक कै. नारायणराव कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी बोलताना या आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, गेली वीस वर्षे तीव्र लढा उभा करून प्रतापगडाच्या पायथ्याशी उभा करण्यात आलेले अफजल खानाचे थडग्या भोवतीच्या दर्ग्याचे अतिक्रमण हटवण्यासाठी रस्त्यावरची व विधान भवनातील लढाई लढून आम्ही महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी सरकारकडून अफजलखानाचा थडगं उध्वस्त करून टाकलं त्याच धरतीवर आता विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून विशाळगडावरती उभारण्यात आलेला बेकायदेशीर दर्गा व विशाळगडावरती झालेले इस्लामीकरण, त्या ठिकाणी सुरू असलेली मांसाहार विक्री, दारू विक्री बंद करून तिथे उध्वस्त करण्यात आलेल्या हिंदू देवतांच्या मंदिराचे जिर्णोद्धार करणार आहोत. याच विशाळगडावर वीर बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशीद यांची भव्य स्मारक तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या शेवटच्या भेटीचे स्मारक उभा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ५०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणार आहोत. यासाठी लवकरच सांगली कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना एकत्रित आणून विशाळगडावर भव्य आंदोलन उभं केलं जाईल. या मध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असे आवाहन केले.

याप्रसंगी बोलताना भाजपाचे युवा नेते पै. गौतम भैया पवार म्हणाले, केंद्रामध्ये मोदीजींच्या रूपाने हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आलं आहे, महाराष्ट्रात भाजप सेनेचे हिंदुत्ववादी सरकार आलं आहे. माजी आमदार नितीन शिंदे यांनी ज्या पद्धतीने प्रतापगड भूमि मुक्ती आंदोलन यशस्वी केले. अगदी त्याच पद्धतीने विशाळगडाची मोहीम आपल्याला फत्ते करायांची आहे. इस्लामीकरण, आणि बेकायदेशीर दर्गा हटून त्या ठिकाणी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक गडाचं व त्यावर असलेल्या हिंदू देवतांच्या मंदिरांचे पुनर्प्रस्थापन करणे ही आज काळाची गरज आहे. यासाठी या आंदोलनाला सर्वजण एकत्र येऊ, यासाठी आम्ही सर्व प्रकारची मदत करू, कोणत्याही परिस्थितीत विशाळगडाला इस्लामीकरणाच्या विळख्यातून बाहेर काढू. तोपर्यंत हे आंदोलन, हा लढा चालूच राहील यामध्ये सर्व हिंदू तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन पवार यांनी केलं.

स्वागत व प्रास्ताविक केदार खाडीलकर यांनी केले व सूत्रसंचालन अविनाश मोहिते यांनी केले.

यावेळी संतोष देसाई, ओंकार शुक्ल, विष्णू पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ. भालचंद्र साठे आदींची भाषणे झाली.

या मेळाव्यास अभिमन्यू भोसले, रवि वादवणे, प्रसाद रिसवडे, राहुल बोळाज, मोहन जामदार, अमोल काळे, अजित काशीद, अप्पा डांगे, पोपट कदम, विजय भिडे, बाळासाहेब मोहिते-पाटील, पैलवान प्रदीप निकम, अजय काकडे, प्रथमेश वैद्य, शुभम चव्हाण, सौरभ सटाले, श्रीधर मिस्त्री, अनिकेत खिलारे, रामभाऊ सूर्यवंशी, निलेश हिंगमिरे, सुहास कलघटगी, प्रकाश चव्हाण, संभाजी पाटील, संजय जाधव आदिंसह शिवभक्त, राष्ट्रभक्त व हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.