प्रतिष्ठा न्यूज

संस्कार भारती तर्फे रविवारी गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : संस्कार भारती पश्चिम प्रांत सांगली जिल्हा समिती दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम करीत आहे. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रविवार दिनांक १६ जुलै २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता टिळक स्मारक मंदिर सांगली येथे संस्कार भारती सांगलीचे ज्येष्ठ सभासद कै. प्रभाकर गद्रे यांचे स्मरणार्थ गुरुपौर्णिमेनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर गुरूंचा सत्कार करण्याचे ठरविले आहे. यामध्ये भजन क्षेत्रात काम करणारे मधुकर गजानन कदम, नाट्य क्षेत्रात काम करणारे श्री सुरेश शंकर कोरे, लोककलेत काम करणारे शाहीर डॉ. देवानंद माळी, किर्तनाला तबलासाथ करणारे सुधीर रघुनाथ जोशी या चार गुरूंचा सत्कार सांगली मधील ज्येष्ठ निवेदक, कलाकार विजयदादा कडणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच “स्वरांजली” संगीत क्लास च्या संचालिका सौ. अंजली कुलकर्णी यांच्या शिष्यांचे सांगीतिक “गुरुवंदना” हा गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी माहिती संस्कार भारती सांगली चे कार्यकारिणी सदस्य आणि कार्यक्रम प्रमुख भालचंद्र चितळे यांनी दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.