प्रतिष्ठा न्यूज

तासगाव पोलिसांच्या तत्परतेने महिलेला रात्री एक वाजता मदत : कर्तव्यदक्ष पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:रात्री एकच्या दरम्यान सावर्डे येथे एक महिला संशयास्पदरित्या एकटी गावात फिरत असल्याची माहिती गावचे पोलीस पाटील सुरेश पाटील यांना मिळाली.त्यांनी तात्काळ तासगावचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्याशी संपर्क केला,घटनेचे गांभीर्य ओळखत निंभोरे यांनी तात्काळ पोलीस टीम रवाना करून  संबंधित महिलेला सुभाष नगर तालुका मिरज येथे राहत असलेल्या ठिकाणी सुरक्षित पोहोच केले.
ऐन मध्यरात्री सावर्डे सारख्या आडवाटेच्या गावातून तासगाव पोलिसांच्या संवेदनशील तत्परतेमुळे संबंधित महिलेला सुरक्षित घरी पोहोचवता आले.याबाबत तासगाव पोलिसातून मिळालेली माहिती अशी की रविवारी रात्री १ वाजता सावर्डेच्या पोलीस पाटील यांनी पोलिसांना फोन करून सावर्डे गावी एक महिला एकटीच संशयितरित्या बसली असल्याचे व ती उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे सांगितले.यावर पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलीस सावर्डेला रवाना केले.घटनास्थळी पोलीस पोचल्यानंतर हि सदर महिला तिचे नाव व पत्ता सांगत नव्हती.मनीषा पवार या महिला पोलिसांच्या मार्फत तिचे समुपदेशन केल्यानंतर तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सर्वांच्याच लक्षात आले.तिला महिला पोलीसांसोबत पोलीस ठाण्यात आणून त्यांना विश्वासात घेऊन खात्री केली असता तिने नाव सांगून राहणार सुभाष नगर मिरज येथील असल्याचे सांगितले.
तसेच संबंधित महिला ही सुभाष नगर मिरज येथे निवासी शाळेत राहण्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.या साऱ्या गोष्टीची खात्री करून त्या महिलेला महिला पोलीस स्टाफ सह सुभाष नगर येथील त्यांचे घरी सुखरूप पोहोचवण्यात आले.
महिलांच्या प्रति दाखवलेल्या  संवेदनशीलता व तत्पर तेने केलेल्या तासगाव पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांच्यातून स्वागत होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.