प्रतिष्ठा न्यूज

मराठा समाजातील सर्व बांधवांनी जास्तीत जास्त लोकसंख्येने मराठा क्रांती मोर्चा मध्ये सहभागी व्हावे- माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चा तर्फे सांगलीत रविवार दिनांक 17 रोजी होणाऱ्या मोर्च्याची तयारी पूर्ण झालेली आहे सांगली जिल्हा व आजूबाजूच्या जिल्ह्यामधून संपूर्ण मराठा समाज या क्रांती मोर्चा साठी येणार आहे. या मोर्चा करिता सांगली जिल्ह्यातील मराठा समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी गेली अनेक वर्ष शासन दरबारी चालू आहे परंतु दिवसेंदिवस ह्या मागणी करिता शासन दरबारी चाल दखल होत आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मराठा समाज हा पूर्णपणे रस्त्यावर उतरलेला आहे. नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी 17 दिवसाचे आमरण उपोषण करून महाराष्ट्राला आणि मराठा समाजाला एक नवीन क्रांती निर्माण करून दिली. आरक्षण बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार धार्मिक ध्रुवीकरण अशा अनेक गोष्टीमुळे महाराष्ट्रातील केवळ मराठा समाजातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष निर्माण झालेला आहे. समाजाच्या तळागाळापर्यंत याविषयी जागृती करण्याची सध्या गरज आहे व आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी व त्याची दखल घेण्यासाठी आपला हा मोर्चा महत्त्वपूर्ण आहे. भविष्याच्या उज्वल पिढ्यांसाठी आपण प्रत्येकाने अधिकाधिक संख्येने समाज बांधव सहभागी व्हावे ही काळाची गरज आहे. आपली जबाबदारी म्हणून मोर्चामध्ये सामील व्हावे आणि सहभाग नोंदवावा. म्हणूनच माझे कर्तव्य म्हणून मी या मोर्चात सहभाग नोंदवणार आहे आपणही नोंदवावा व इतरांनाही प्रोत्साहित करावे असे मी यावेळी आपणास आव्हान करीत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.