प्रतिष्ठा न्यूज

प्रभाकर ऊर्फ राजु आण्णु कोळी यांची दि रयत बँक एम्प्लॉईज को-ऑफ क्रेडीट सोसायटीच्या संचालकपदी बिनविरोध निवड

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : दि रयत बँक एम्प्लॉईज को-ऑफ क्रेडीट सोसायटीच्या संचालकपदी जिल्हा बँकेचे धडाकेबाज वसुली अधिकारी प्रभाकर ऊर्फ राजु आण्णु कोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. दि रयत बँक एम्प्लॉईज ओसोसायटीच्या ऑफ संचालक मंडळाच्या निवडणूकीचा कार्यक्रम नुकताच झाला. १८ जागांसाठी अठराच अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. यामध्ये जत येथील आणि सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयात वसुली अधिकारी पदावर कार्यरत असलेले प्रभाकर कोळी
यांचीही संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
कोळी म्हणाले, बँकेत प्रामाणिकपणे काम केल्याने आत्तापर्यंत विविध क्षेत्रातील पुरस्कार मिळाले आहेत. चांगल्या कामामुळे बँक एम्प्लॉईज सोसायटीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
सोसायटीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न जाईल, कर्मचाऱ्यांच प्रलंबित प्रश्न तसेच, त्यांना सुलभ आणि कमीतकमी व्याजाने कर्जपुरवठा करण्याबरोबरच त्यांचा आर्थीकस्तर वाढीसाठी प्रयत्न करू. जुन्या संस्थांकडील असलेली थकबाकी वसुल करून बँकची थकबाकी कमी करण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.