प्रतिष्ठा न्यूज

सावळज येथे एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत पालक मेळावा उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे
सावळज : ता. तासगाव येथे जिल्हा परिषद सांगली एकात्मिक बाल विकास सेवा योजना तासगाव अंतर्गत सावळज बिट मध्ये आरंभ सत्र दोन या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आरंभ म्हणजे बालकांच्या विकासाच्या दृष्टीने सुरवातीचे क्षण अतिशय महत्वाचे असून बालकांच्या वाढी बरोबर बालकांच्या मेंदूचा सुध्दा विकास झाला पाहिजे यासाठी बालकांना स्पर्श, सवांद, खेळ,तसेच सुरक्षित वातावरण निर्माण करणे आवश्यक असते याची पालकांना जाणीव व्हावी यासाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर मेळाव्याचे उद्घाटन माजी जि. प. सदस्य मा. सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास सावळज गावच्या सरपंच सौ. मिनल पाटील, सिद्धेवाडीच्या सरपंच सौ. वैशाली चव्हाण, सावळजचे उपसरपंच रमेश कांबळे,मा. उपसरपंच संजय थोरात, परनाळकर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन सावळज बीट सुपरवायझर मकानदार मॅडम यांनी केले होते हा कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या सहकार्याने आनंदात व उत्साहात पार पडला.
यावेळी या कार्यक्रमास सर्व अंगणवाडी सेविका बालक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.