प्रतिष्ठा न्यूज

खाडे स्कूलमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती विवध उपक्रमांनी साजरी

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था सांगली संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल मिरजच्या वतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती विवध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले. दोघांच्या जीवनातील संघर्ष, त्याग व बलिदानाविषयी मुलांना माहिती सांगितली.
स्कूलच्या मुलांनी शाळेचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. स्वच्छता माहितीचे फलक घेवून स्वच्छता फेरीचे आयोजन केले. तसेच स्वच्छते विषयी जनजागृती करणारे पथनाट्य मिरजेतील गांधी चौकामध्ये सादर केले. यासाठी बघ्यांची गर्दी जमा झाली होती. सादर केलेल्या नाटिकाचे अनेकांनी कौतुक केले. या नाटिकेसाठी मुलांना स्कूलच्या शिक्षिका आर्षा गांधी व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन व मदत मिळाली. तसेच या उपक्रमासाठी संचालिका सुमन खाडे, सुशांत खाडे व कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांचे मोलाचे मार्गर्शन व सहकार्य लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.