प्रतिष्ठा न्यूज

दिवाळी सणानिमित्त नांदेड-पुणे 2 विशेष रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी धावणार

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाश्यांना नांदेड ते हडपसर (पुणे)जाण्यासाठी सोईस्कर व्हावे खाजगी वाहनांची प्रवास करणे महागात पडेल या साठी नांदेड रेल्वे विभागाने प्रवाशांची गर्दी व हित लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे विभागाने हुजूर साहिब नांदेड ते हडपसर (पुणे)दरम्यान एक विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे.
गाडी क्रमांक – वेळ – दिनांक व मार्ग खालील प्रमाणे

1) गाडी क्रमांक- 07403 नांदेड ते हडपसर (पुणे) प्रस्थान- ( जाण्याची वेळ ) 21.30 व आगमन- ( येण्याची वेळ ) 10.45 दिनांक 23 ऑक्टोबर 2022 रविवार.

2) गाडी क्रमांक- 07404 हडपसर (पुणे) ते नांदेड प्रस्थान (जाण्याची वेळ ) 11.50 व आगमन ( येण्याची वेळ ) 23.45 दिनांक 24 ऑक्टोबर 2022 सोमवार.

गाडी पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, घाटनांदूर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, कुर्डुवाडी, दौंड या रेल्वे स्थानकांवर थांबेल असे जनसंपर्क कार्यालय, नांदेड यांनी कळविले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.