प्रतिष्ठा न्यूज

‘परशुराम ‘ च्या चिमुकल्यांनी घेतली शपथ इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याची शपथ

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.२१ : परशुराम विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षक व चिमुकल्यांनी पर्यावरणाचे संतुलन व प्लास्टिक बंदी ला प्रोत्साहन मिळावे यासाठी इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली.
उपक्रमशील शिक्षक, प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली रंगीत कागदापासून घरगुती आकाश कंदील तयार केले. पालकांनीही त्यांनी बनवलेले आकाशकंदील घरासमोर लावण्याचा निर्णय घेतला. फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण होते. यासाठी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडणार नसल्याची शपथ घेतली.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य रंगराव गोसावी, गिरी बुवा, सुरेश थोरात, कुंडलिक जाधव, दीपक पाटील, अश्विनी पाटील, स्वाती चौगुले, सुप्रिया माळी, फरिदा बोबडे, शिंदे आदी शिक्षकांचा सहभाग होता.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.