प्रतिष्ठा न्यूज

मराठ्यांनो आरक्षण अंतिम टप्प्यात- अशीच एकजूट कायम ठेवा : संघर्ष योद्धा- मनोज पाटील जरांगे

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : – मराठ्यांनो आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. आरक्षणा अभावी आपल्या पूर्वजांनी 70 वर्षे खस्ता खाल्या, आपल्या मुलांना शिक्षण घेऊन नोकरी नसल्यामुळे ते सुशिक्षित बेकार झाले व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीने साथ दिली नसल्याने आपल्या समाजाचे वाटोळे झाले. पुढारी आपल्या लेकरांच्या पाठीमागे उभे राहतील असे वाटत नाही व आपल्या पाठीशी कोणीच नाही. गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या एकजुटीतून उभा राहिला आहे. आता तो अंतिम टप्प्यात आला असून संधीचे सोनं करण्यासाठी अशीच एकजूट कायम ठेवा असे प्रतिपादन मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांनी मारतळा येथील आयोजित सभेत बोलताना केले.
लोहा तालुक्यातील मारतळा येथे दि. 8 डिसेंबर 2023 रोजी सकल मराठा समाज आरक्षणाचे आंदोलन उभारणारे मनोज पाटील जरांगे यांची उमरा सर्कल मधील सकल मराठा समाज आयोजित मराठा समाज आरक्षण जनजागृती संदर्भात जाहीर सभा संपन्न झाली.
प्रारंभी मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील यांनी कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कापशी गुंफा मठाचे मठाधिपती गुरुवर्य- देवगिर महाराज यांचे हस्ते संत तुकाराम महाराजांची गाथा, पगडी व विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन पावन संतभूमीत यथोचित स्वागत करण्यात आले.
तसेच मनोज पाटील यांचे मारतळा नगरीत आगमन होताच उपस्थीत सकल मराठा समाज उमरा सर्कलच्या वतीने जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली व शाळेतील मुलींनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. तसेच उपस्थित लाखोंच्या सकल मराठा समाजाच्या वतीने टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, राजकीय पुढारी आपल्या लेकरांच्या आरक्षणाच्या लढ्यासाठी पाठीशी राहतील असे मला वाटत नाही आरक्षणा अभावी  लेकरांचे नुकसान तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरी पणामुळे शेतीची सततची नापीकी यामुळे आपल्या समाजाचे वाटोळे झाले आहे. समाज बांधवांना माझं एकच सांगणे आहे की, आरक्षणासाठी आत्महत्या करून लेकरांना वाऱ्यावर सोडू नका व व्यसनापासून दूर राहा अशी भावनिक साद घालत त्यांनी आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या  बांधवांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे आपल्या समाजाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे म्हणत समाजाच्या एकजुटीचा स्वागत केले व अशीच एकजूट पुढे कायम ठेवा असे आवाहन त्यांनी केले.आरक्षणासाठी जनजागृती व आरक्षण आंदोलने शांततेच्या मार्गाने  मार्गाने चालू ठेवा आरक्षण शंभर टक्के मिळेलच, मराठा व कुणबी एकच असून येत्या 24 डिसेंबर पर्यंत सरकारने सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न दिल्यास व काही दगाफटका केल्यास पुढील आंदोलनाची दिशा काय आसनार हे 17 डिसेंबर रोजीच्या अंतरवली सराटी येथील आयोजित बैठकीत सांगेल व समाजाच्या वतीने पुढील आंदोलनाची दिशा ठरेल.
मी समाजाशी कदापि गद्दारी करणार नाही व माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आरक्षणाचा लढा सुरू ठेवेल, आरक्षण घेतल्याशिवाय मी एक इंचही मागे हाटणार नाही असे ही ते म्हणाले. या सभेसाठी उमरा सर्कल सह, जिल्हातील मराठा समाज बांधवांची लाखोच्या संख्येने उपस्थिती होती.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.