प्रतिष्ठा न्यूज

बस‌ चालकाच्या नियंत्रणामुळे ‌मोठी जीवितहानी टळली : जोमेगाव तलावातील घटना

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : नांदेड आगाराची बस‌ लाडका येथे ‌जात‌ असतानाच‌ जोमेगाव‌ असलेल्या‌ तलावात ‌उतरली‌ मात्र‌ चालकानी नियंत्रण मिळवत बस‌ खोल तलावात जात असतांना थांबविले म्हणून मोठी जीवितहानी टळली असल्याची घटना दि‌.8 डिसेंबर 2023 शुक्रवारी सकाळी ‌ 8:00 वाजताच्या दरम्यान ‌घडली‌,
त्याचे‌ झाले‌ असे‌ की‌ नांदेड ‌आगाराची‌ बस‌ क्र‌.एम‌ एच‌ 07 सी‌ 7243 ही‌ बस‌ चालक‌ एम‌.ई‌.सोनकांबळे‌ व‌ वाहक‌ बि‌.एम‌.कापसीकर‌ हे‌ दोघेजण नांदेहून‌ प्रवासी‌ भरून‌ लाडका या गावी दि‌.8 डिंसेबर‌ रोजी‌ सकाळी‌ 7:00 वाजता‌‌ लाडका‌ गावाकडे निघाली‌ मात्र आज‌ सर्वत्र ‌धुक्के पसलेले‌ होते‌. ही‌ बस‌ जोमेगाव‌ तलावा जवळील ‌वळण‌ रस्त्यावर‌‌ येताच‌ वळण‌ रस्ता‌ व‌ पहाटे पासून ‌पसलेले‌ धुक्के‌ यामुळे ‌रस्ता बरोबर न दिसल्याने चालकाने ही‌‌ बस‌ पुलाचा‌ कठ्डा‌ तोडत‌‌ थेट तलावातच‌ गेली‌ मात्र‌ चालक‌ सोनकांबळे बसवर‌ नियंत्रण ‌ मिळवत‌ जागेवरच‌ थांबवली‌ अन्यथा‌ ही बस तलावात 14 फुटांपर्यन्त‌ खोल‌ गेली असती व मोठी‌ दुर्घटना घडली ‌असती‌ या बस मध्ये केवळ 12 प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती वाहक बी‌.एम‌.कापसीकर‌ यांनी‌ दिली‌ आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.