प्रतिष्ठा न्यूज

शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी यापुढे सुद्धा लढा सुरू राहील : मराठवाडा शिक्षक संघ अध्यक्ष विश्वासराव

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : शिक्षकांच्या अडी- अडचणी विविध समस्या मागण्या यासाठी आपण शिक्षकांच्या बाजूने खंबीरपणे उभे असून; शिक्षकांना न्याय देण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या माध्यमातून यापुढे सुद्धा त्यांना न्याय,हक्क मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन श्री मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री सुर्यकांत संग्राम विश्वासराव यांनी केले.
त्यांचा आज जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या वतीने श्री यंकटराव चिलवरवार यांच्या हस्ते शाल,श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे मार्गदर्शक श्री मधुकरराव कुरुडे हे होते.
यावेळी बोलताना श्री विश्वासराव म्हणाले की, आजही अनेक शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत जुनी पेन्शनची समस्या, विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देणे ,वरिष्ठ वेतनश्रेणी मिळणे अशा अनेक विविध शिक्षकांच्या समस्या असून त्यासाठी मी शिक्षकांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहील असे त्यांनी यावेळी अभिवचन दिले .ते पुढे बोलताना म्हणाले की निवडणुका येतात जातात, आणि जय पराजय होत असतो त्यामुळे आपण शिक्षकांनी खचून जाऊ नये. पुन्हा एकदा संघटनेची बांधणी करू या आणि सर्वांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मी सर्वाचा ऋणी आहे. तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि शिक्षकांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली .
यावेळी अनेक शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना श्री मधुकरराव कुरूडे म्हणाले की , शिक्षकांनी आजच्या परिस्थितीत राजकीय संघटना आणि सामाजिक संघटना, शिक्षकांची संघटना हे साम्य समजून घ्यावे .श्री विश्वासराव सरांना मराठवाड्यातील मतदार बंधू भगिनींनी भरपूर प्रमाणामध्ये मतदान केले.त्यामुळे आपण दुसऱ्या क्रमांकावर राहिलो आहे. शिक्षकांची एकजूट यातून दिसून येते. त्यामुळेच आपण चांगल्या प्रकारचे लढत देऊ शकलो आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिलो.
अनेक राजकीय पक्षांच्या पुढा- यांना सुद्धा विश्वासराव यांच्या दुसऱ्या क्रमांकावर राहण्याबद्दल कौतुक वाटले आहे.त्यामुळे आपल्या संघटनेची ताकद खूप असून त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा जोमाने संघटनेची बांधणी करावी लागेल आणि शिक्षकांनी सुद्धा राजकीय पक्षांच्या मागे न राहता सामाजिक संघटनेच्या बाजूने उभे टाकावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपली संघटना म्हणजे माजी आमदार पी.जी.दस्तुरकर, माजी आमदार राजाभाऊ उदगीरकर यांच्या विचारावर चालणारी संघटना आहे.तसेच श्री पी.एस.घाडगे सर, माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरूडे सर यांचे मार्गदर्शन आहे. त्यामुळे आपल्या संघटनेला खूप सामाजिक पाठबळ आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले .
या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष श्री व्यंकटराव चिलवरवार ,उपाध्यक्ष यशवंत गजभारे, श्री आनंद कर्णे, शंकरराव हणमंते, अॅड.अविनाश भोसीकर, श्री अशोक पाटील सुगावकर, श्री मोरे सर ,श्री जाधव सर ,श्री वाघमारे सर ,श्री साखरे सर ,श्री कदम सर. श्री सादुलवार, बुद्धेवार सर श्री कदम सर, श्री मठपती सर.श्री जाधव सर ,श्रीमती कालिंदा वायगावकर मॅडम आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आनंद कर्णे, यांनी केले तर आभार श्री वाघमारे सर यांनी व्यक्त केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.