प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत पकडली ५ कोटी ७९ लाखांची व्हेल माशाची उलटी : तस्करी करणारी टोळी जेरबंद

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाव्हेल माशाची उलटी सदॄष्य पदार्थ (अंबरग्रिस) तस्करी करणारी टोळी जेरबंद त्याचेकडुन ५ किलो ७१० ग्रॅम वजनाचा किंमत अंदाजे ५,७९,२५,०१० /- ( पाच कोटी एकोणऐंशी लाख पंचवीस हजार दहा रूपये )
रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस अधीक्षक बसवराज तेली व अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी सपोनि संदीप शिंदे अमंलदार याचे पथक तयार करुन सांगली जिल्हयातील अवैध मालाची तस्करी करणारे इसमाचा शोध घेऊन त्यांचेबर कारवाई करण्याबाबत आदर्शित केले होते.
नमुद पथकाने सांगली जिल्हयातील अवैध मालाची तस्करी करणारे इसमाचा शोध माहिती घेत पेट्रोलिंग
करीत असताना सपोनि संदीप शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शामराव नगर सांगली मधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम कॉलेज जवळ दोन इसम अंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये उच्च मागणी असलेले व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) विक्री करणे करीता घेवुन येणार आहेत अशी माहिती मिळाली. मिळाले माहिती प्रमाणे वरील सपोनि
संदीप शिंदे यांनी मिळाले बातमी प्रमाणे शामराव नगर सांगली मधील डॉ एपीजे अब्दुल कलाम कॉलेज जवळ सापळा लावुन वॉच करीत असताना एक पांढ-या रंगांच्या अॅक्टीव्हा दुचाकी वाहनावर एक इसम थांबला दिसला त्याच्याजवळ एक पांढ-या रंगांची बोलेरो पिकअप उभी असले वाहनातुन एक पिवळसर रंगांचा बॉक्स घेवुन खाली उतरला, त्यांचा मिळाले
बातमीप्रमाणे संशय आलेने त्या दोन इसमांना पंच म्हणुन सोबत असले वन विभागाकडील अधिकारी यांचे समक्ष पकडुन सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्या इसमांना त्यांचे नाव गांव विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव १) सलीम
गुलाब पटेल च.व. ४९ रा. खणभाग घर नं. ८४७ सय्यद अमीन रोड सांगली २) अकबर याकुब शेख, चय ५१, रा. मु.पो. पिंगोली, मुस्लीमवाडी, ता. कुडाल, जि. सिंधुदुर्ग असे असल्याचे सांगितले. सदर इसमांना त्याठिकाणी हजर असण्याचे कारण विचारले असता ते काही एक समाधान कारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्या दोन इसमांची वन विभागाकडील अधिकारी व उपस्थित असले पंचासमक्ष सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्यांची अकबर याकुब शेख अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात पुठ्यांची बॉक्स मध्ये पिवळसर तांबुस रंगांचे ओबड धोबड आयताकृती
आकाराचे घट्ट पदार्थ असलेले ८ नग मिळुन आले. त्याबाबत अकबर याकुब शेख यास विचारले असता त्याने सांगितले
की, हा पदार्थ व्हेल माशाची उलटी असुन आमचा आणखी एक साथीदारा आचरा ता. मालवण जि. सिंधुदुर्ग याने विक्री
करणे करीता दिला असुन तो सलीम गुलाब पटेल यांचे मध्यस्तीने विक्री करणे करीता घेवुन आलो असल्याचे सांगितले.
नमुद इसमांचे कब्जात मिळुन आलेला पदार्थाची वन विभागाकडील अधिकारी यांनी व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ याची प्राथमिक तपासणी करुन तो पदार्थ व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) असलेचे सांगुन त्यावर प्रतिबंधित असल्याचे सागितले व त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति किलो ०१ कोटी रुपये इतकी किमंत असल्याचे
सांगितले. त्यावेळी सपोनि संदीप शिंदे यांनी अकबर याकुब शेख याचे कब्जातुन ५ किलो ७१० ग्रॅम वजनाचा किंमत अंदाजे ५,७५,५०,०१०/- रुपयाचा व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) व त्याचे कब्जात मिळाले २५०००/-
जार रुपये किंमतीचा अॅक्टीव्हा मोपेड ३,५०,०००/- रुपये किमतीचा महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकुण
५,७९,२५,०१०/- रुपयाचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने सपोनि संदीप शिंदे यांनी जप्त करुन त्या दोघांचे विरुध्द सांगली
शहर पोलीस ठाणे येथे वन्यजीव अधिनियम १९७२ कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.