प्रतिष्ठा न्यूज

च्याट-जीपीटी सारखे तंत्रज्ञान जगासमोरील नविन आव्हान : मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल

प्रतिष्ठा न्यूज
लातूर दि. 9 : माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्या वतीने आयोजित तंत्रज्ञान व खेळणी या विषयावर आधारित पन्नासाव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आज श्री.श्री.रविशंकर विद्यालय लातूर येथे झाले.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या अटल इनोव्हेशन लॅबच्या वतीने सादर करण्यात आलेलि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित असलेली अलेक्सा हे विज्ञान प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरली. या प्रोजेक्टला भेट देवुन अभिनव गोयल यानी अलेक्साशी संवाद साधला. त्यावेळी च्याट जीपीटी सारखे नवीन तंत्रज्ञान जगासमोरची नवे आव्हान आहे. त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे जावे लागेल असे मत लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अभिनव गोयल यांनी व्यक्त केले आणि स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थी आणि प्रोजेक्टचे कौतुक केले.
यावेळी विभागीय शिक्षण उपसंचालक मा.श्री.गणपतराव मोरे, लातूर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री.सुधाकर तेलंग, सहाय्यक शिक्षण उपसंचालक दत्तात्रय मठपती, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री.राजेंद्र गिरी, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मा.श्री.नागेश मापारी, प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी श्रीमती. वंदना फुटाणे,ज्येष्ठ अधिव्याख्याता श्रीमती.भगीरथी गिरी, उपशिक्षणाधिकारी श्रीमती.तृप्ती अंधारे, गटशिक्षणाधिकारी श्रीमान.पंचगले, खाजगी मुख्याध्यापक संघाच्या महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री प्रकाश देशमुख, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, व्यवस्थापन मंडळातील महादेव ढमाले, श्री.बालवाड, निशिकांत मिरकले, मनोजकुमार मोठे, शिवलिंग नगापूरे, यांच्यासह प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मोहन खुरदळे, मुख्याध्यापिका अरुणा कांदे, प्रभाकर सावंत, सुरज सोनटक्के, विनोद सूर्यवंशी, प्रशांत कांबळे, अलका अंकुशे, अब्दुल गरीब शेख, अरुण काळे, विद्यार्थिनी कु.पायल मोरे, चि.सोहम सोनवणे यांच्यासह अनेक शाळेतून आलेले विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.