प्रतिष्ठा न्यूज

मिरजेतील प्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ डॉ रियाज मुजावर यांनी बायपास टाळून हृदयाच्या नाडीमध्ये कॉईल बसवून यशस्वी शत्रक्रिया करत रुग्णाला दिले जीवनदान

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : कर्नाटक शंभरगी येथील वय वर्षे ४८ असणाऱ्या रुग्णाच्या हदयामध्ये फुगा निर्माण झाला होता.त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे होते.मात्र प्रसिद्ध हहृदयरोग तज्ञ डॉ रियाज मुजावर यांनी सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आधुनिक पद्धतीने या रुग्णावर उपचार करून त्याला जीवदान दिले.सदर रुग्णांची यापूर्वी एन्जोप्लॅस्टि झाली होती. मात्र त्यांनतरही त्याच्या हदयाच्या नाडीत फुगा निर्माण झाला होता. यासाठी बायपास सर्जरी करण्याची गरज असते. डॉ रियाज मुजावर यांनी बायपास सर्जरीला फाटा देत स्प्रिंग घालून यशस्वी शत्रक्रिया केली आहे.अशा प्रकारे हदयाच्या नाडीमध्ये कॉईल घालून शत्रक्रिया करण्याची पश्चिम महाराष्ट्रात पहिलीच शत्रक्रिया असल्याचे डॉ रियाज मुजावर यांनी सांगितले. तसेच बायपास टाळून अशी शत्रक्रिया करून रुग्णाला जीवदान दिल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ रियाज मुजावर यांचे आभार मानले.
         या शस्त्रक्रियेसाठी गुरूवार्य पी. के. डॅश सर यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच “ही शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी मी एकटा जबाबदार नसून यासाठी पूर्ण टीमचे सहकार्य मिळाले” असेही म्हणाले. . या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर डॉ. रियाज मुजावर यांनी त्यांचे प्रिय कैलासवासी गुरू ई. जे. डेव्हिड यांची आवर्जून आठवण काढली. तसेच मिरज आरोग्यपंढरीत आशी शस्त्रक्रिया होणे म्हणजे अभिमानास्पद आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.