प्रतिष्ठा न्यूज

मार्केट कमिटी शिल्पकारांचा राष्ट्रवादी युवककडून सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : अखंड 33 वर्षे, सलग दुसरी राजकीय पिढी, 1990 पासून आर. आर. आबा व त्यानंतर सुमनताई व रोहितदादा यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत शेतकऱ्यांसाठी बाजार समितीवर अखंड सत्ता ठेवणाऱ्या विसापूर सर्कल मधील 21 गावातील यशाच्या शिल्पकारांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस मार्फत सत्कार करण्यात आला.
राज्यात सत्ता असो वा नसो, तासगाव तालुक्यातल्या शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव, कर्जमाफी, विविध कृषी योजना जिल्हा मध्यवर्ती बँक, विकास सोसायट्या व राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून मार्केट कमिटी सुमनताई व रोहितदादांच्या मार्गदर्शनाखाली राबवत असते.
तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची जीवन वाहिनी असलेल्या मार्केट कमिटीवर सत्ता अबाधित राखण्यामध्ये विसापूर महसूल सर्कलमधील मोहननाना पाटील, प्रभाकर काका पाटील, अर्जुन बापू पाटील, संभाजी पाटील, मोहन अण्णा पाटील तसेच प्रत्येक गावातील प्रमुख आदी मान्यवरांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस विसापूर कडून सत्कार करण्यात आला.
मार्केट कमिटी हे सत्तास्थान न मानता शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुबत्ता आणण्याची गंगोत्री मानून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सुमनताई व रोहितदादांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस कटिबद्ध असल्याचे विसापूर सर्कलचे अध्यक्ष, तासगाव तालुका कार्यआध्यक्ष सचिन पाटील यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी युवक प्रकाश मोहीते,शुभम पाटील, धनंजय पाटील,हर्षवर्धन पाटील पाटील,जांबवंत पाटील, दिनित पाटील, राकेश पाटील,अजित कचरे, राहुल जाधव सह विसापूर सर्कलमधील सर्व गावांमधील मान्यवर, विकास सोसायट्यांचे सभासद, राष्ट्रवादी युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.