प्रतिष्ठा न्यूज

2024 ला मोदींना पूर्ण बहुमत द्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे; कवठेमहांकाळ राष्ट्रवादीला खिंडार नगरसेवकांसह नेत्यांचा भाजपात प्रवेश

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : गेल्या नऊ वर्षात भारत देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या,राम मंदिर पासून ते 370 कलमा पर्यंत धाडसी निर्णय घेणाऱ्या,हिंदू संस्कृती संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपणाकडून पूर्ण समर्थन मिळावे, 2024 ला देशात मोदींना पूर्ण बहुमत द्या असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.भाजपच्या संपर्क ते जनसमर्थन यात्रेला तासगाव शहरात  जोरदार प्रतिसाद मिळाला.यात्रेच्या निमित्ताने तासगाव शहरात आयोजित कार्यक्रमात बोलताना बावनकुळे बोलत होते,यावेळी बोलताना  चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले  भाजपच्या संपर्क ते जनसंवाद यात्रेला संपूर्ण राज्यात जोरदार प्रतिसाद मिळत आहे,2024 ला पंतप्रधान कोण या प्रश्नाची उत्तर लोक या यात्रेच्या निमित्ताने आम्हाला देतायेत लोक स्वयंस्फूर्तीने नरेंद्र मोदी यांचे नाव घेत आहेत.यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले पंतप्रधान मोदींनी कोरोना महामारीत 140 कोटी जनतेला लस दिली,त्याचबरोबर जगातील 103 देशांना कोरोनाची लस उपलब्ध करून दिली,इस्त्रो सहाय्याने चांद्रयान योजना यशस्वी करुन चंद्रावर तिरंगा फडकवीला,जगात भारताची मान उंचावलीआहे.काश्मिरमधील 370 कलम हटवुन कणखर नेत्रुत्व असल्याचे दाखवले.अयोध्या येथे प्रभु राम मंदीर निर्माण करुन हिंदुचे भाविकांचे वचन पुर्ण केले.महिलांना लोकसभा व विधानसभेत आरक्षण मिळवुन दिले,बावनकुळे म्हणाले ज्यांनी खंजीर खुपसला त्यांना फडणविस यांनी घरी बसवीले.आज मोदींच्या विरोधात एकवटलेल्या  इंडीया आघाडीची हिंदु संस्क्रुती संपवण्याची भाषा चालवली आहे हिंदू संस्कृती वाचवण्यासाठी मोदीजींना 2024 जोरदार समर्थन द्यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.यावेळी बोलताना पालकमंत्री सुरेश खाडे यांनी नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केलेल्या कवठेमंकाळच्या राष्ट्रवादीच्या  नगरसेवकांचे व नेत्यांचे स्वागत केले व आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी विरोधकांवर नाव न घेता टिकेची झोड उठवली ते म्हणाले विस्तारित टेंभू योजनेच्या सुप्रीमा मिळते हे लक्षात आल्यावर आमच्या तरुण सहकार्यांला  उपोषणाचा दिखावा करावा वाटला, परंतु चार तासातच झोपायची वेळ आली.आम्ही पाण्यासाठी नऊ दिवस उपोषण केले 3000 लोकांनी मुंडन केले 5000 महिला रस्त्यावर उतरल्या त्यावेळी या तालुक्यातल्या पाणी योजना मार्गी लागल्या.गेली30-35 वर्ष या सामान्य लोकांच्या जीवावर मी संघर्ष करतोय इथून पुढेही करत राहू अशी ग्वाही यावेळी खासदार पाटील यांनी दिली.त्याचबरोबर मोदींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे आगामी निवडणुकीत विरोधकांची डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास खासदार संजय काका यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी आमदार गोपीचंद पडळकर व युवा नेते प्रभाकर पाटील यांची भाषणे झाली.
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे महाविजय 2024 अभियाना संदर्भात सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत या अंतर्गत त्यांनी तासगाव शहरात साने गुरुजी नाट्यगृह येथे
सांगली लोकसभा मतदारसंघातील तासगाव-कवठेमंकाळ, खानापूर-आटपाडी व जत विधानसभा मधील बूथ वॉरियर्स बरोबर संवाद बैठक पार पडली त्याचबरोबर – घर चलो अभियान व अमृत कलश पदयात्रा घर चलो अभियान सांगता समारंभ,प्रभावशाली व्यक्ती भेटअसे कार्यक्रम आयोजित  करण्यात आले.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे,सरचिटणीस विक्रांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर,पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मुरलीधर मोहोळ, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे,भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील,लोकसभा प्रभारी दीपकबाबा शिंदे,खानापूर आटपाडी विधानसभा प्रमुख अमरसिंह देशमुख,जत विधानसभा प्रमुख तमनगौडा रवि पाटील,सांगली विधानसभा प्रमुख शेखर इनामदार, डॉक्टर रवींद्र आरळी,मध्यवर्ती बँक संचालक सत्यजित देशमुख, आटपाडी पंचायत समिती सभापती हर्षवर्धन देशमुख,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अनिल पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार,युवानेते संजय तेली व भाजपचे सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष,किसान मोर्चा अध्यक्ष संदीप गिड्डे,जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन खासदार संजय काका पाटील व तासगाव कवठेमंकाळ निवडणूक प्रमुख प्रभाकर बाबा पाटील यांनी केले यावेळी ज्योतिकाकी पाटील,शिवानी  प्रभाकर पाटील व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

राष्ट्रवादीला मोठा धक्का
खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादीला जोरदार धक्का देत या कार्यक्रमात धडाकेबाज नेते रमेश नाना खोत, उपसरपंच विठुरायाची वाडी, रमेश चव्हाण ग्रामपंचायत सदस्य धनाजी माळी, मा चेअरमन विठ्ठल सोसायटी  मोहन खोत, ग्रामपंचायत सदस्य राजेश खोत,कवठेमहांकाळ आरोग्य सभापती मीराबाई वनखंडे, नगरसेवक संजय माने,  ईश्वरा वनखंडे, कवठेमंकाळ लोणार समाज अध्यक्ष शंकर खैरावकर मिस्त्री, मा अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सोमनाथ टोने  यांचा भाजपा प्रवेश व सत्कार प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला‌‌. राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायाने रोहित पाटील यांना हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.