प्रतिष्ठा न्यूज

खा.संजय राऊत आज नांदेड दौ-यांवर : देगलूर येथे कार्यकर्त्याशी संवाद साधणार

प्रतिष्ठा न्युज/ राजु पवार

नांदेड दि.18 : उद्वव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खा.संजय राऊत हे, आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांचे विमानाने आज दि 18 रोजी सायंकाळी मुंबईहून हैदराबाद येथे आगमन होणार आहे. हैदराबाद हून ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रयाण करतील. देगलूर येथील शासकीय विश्राम गृह येथे रात्री ठिक 8:30 वाजता कार्यकर्तयांशी आगामी 2024 च्या निवडणुकीच्या निमित्ताने हितगुज साधणार आहेत. देगलूर येथे खा.संजय राऊत यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. जिल्हा प्रमुख श्री दता पाटील कोकाटे, शिवसेना देगलूर तालूका प्रमुख श्री महेश पाटील,जिल्हा संघटक जि.प.सदस्य श्री दशरथ लोहबंदे पांडूर्णीकर, युवा सेनेचे श्री भागवत पाटील सोमूरकर हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. तसेच नरसी येथे रात्री 9:30 च्या दरम्यान शिवसेना तालूका प्रमुख श्री रविंद्र पाटील भिलवंडे आणि कार्यकर्ते यांच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे.
त्यानंतर खासदार श्री राऊत हे रात्री देगलूर येथून देगलूर ते शंकर नगर नरसी, नांदेड येथे प्रयाग करतील. रात्री त्यांचा मुक्काम शासकीय रेस्ट हाऊस नांदेड येथे राहणार आहे .
तसेच दि.19 मे रोजी लोहा येथे सकाळी 9:30 वाजता सह्याद्री शिवसेना कार्यालयात खा. राऊत संवाद साधणार आहेत. खा.राऊत यांचे कंधार- लोहा शिवसेनेच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब पाटील क-हाळे यांनी दिली आहे.
तसेच त्यांच्यासोबत मराठवाडा शिवसेना संपर्क प्रमुख श्री बबनराव थोरात हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. ते नांदेड येथे रेस्ट हाऊस मध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी शासकीय विश्राम गृह येथे उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.