प्रतिष्ठा न्यूज

सावरकर जयंती निमित्त सांगलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन व विवेक व्यासपीठ, मुंबई आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर वीरभूमी परिक्रमा व विचार जागरण सप्ताहा चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय नामजोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत  दि. २१ मे २०२३ ते २८ मे २०२३ या कालावधीत हा विचार जागरण सप्ताह साजरा होत आहे. आपण जाणून आहातच की स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे थोरले बंधू क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांचे आपल्या सांगली शहरात स्मारक आहे. या पवित्र स्थानाचे महात्म लक्षात घेता या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहाचे निमित्ताने पर्यावरणपूरक सायकल रॅली ने या विचार जागरण सप्ताहास सुरूवात होईल, त्या तिघी, कृतार्थ मी कृतज्ञ मी, माझी जन्मठेप, अनादी मी अनंत मी, असे नाट्यप्रयोग असणार आहेत., स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित गीताचे दिपक पाटणकर यांचा कार्यक्रम, उत्सव तेजांचा स्वा. सावरकर गीतांचा कार्यक्रम, विशेष उपस्थिती – अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज( मठाधिपती, कणेरी मठ, कोल्हापूर), राष्ट्रीय किर्तनकार ह. भ. प. चारूदत्त आफळे महाराज यांची किर्तनसेवा, सुप्रसिध्द सिनेअभिनेते योगेश सोमण यांचा नाट्यप्रयोगाचे या सप्ताहाची सांगता होईल. अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
स्वा. सावरकर यांचे जयंती निमित्त, दिनांक :- 28/05/2023, रोजी सकल समाज बांधवांच्या करिता स्नेह भोजनाचे आयोजन क्रांतीवीर बाबाराव सावरकर स्मारक येथे करण्यात येणार आहे.
या स्तुत्य कार्यक्रमात राष्ट्रीय विचारधारेतील सांगली जिल्ह्य़ातील अनेक संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. तसेच हजारो सावरकर प्रेमी देखील उपस्थितीत राहणार आहेत.
या कार्यक्रमास सांगली जिल्हातील पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच कार्यकर्ते देखील उपस्थितीत राहणार आहेत.
या विचार जागरणाच्या कार्यात व सर्व अभिनव उपक्रमात आपण सर्वांनी सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन मा. श्री. मंगलप्रभात लोढा पर्यटन, कौशल्य विकास, महिला व बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई व विवेक व्यासपीठ मुंबई,  क्रांतीवीर बाबाराव सावरकर स्मारक समिती, सांगली यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेस भाजपचे केदार खाडीलकर, नगरसेवक युवराज बावडेकर, राजाभाऊ देसाई, सार्थक गोसावी उपस्थित होते.

संयोजक संपर्क :- श्री. कृष्णात कदम, मुंबई – 9594969635
श्री. सुहास कुलकर्णी, सांगली – 9890909012

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.