प्रतिष्ठा न्यूज

छत्रपती शिवाजी महाराज हे 17 व्या शतकातील महान शासक होते, तेंव्हा तरुण पिढीने त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा- स्वप्नील पाटील उमरेकर

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : – छत्रपती शिवाजी महाराज (भोसले) 17 व्या शतकातील एक महान शासक होते म्हणून त्यांना छत्रपती व जनतेचा जाणता राजा या नावाने  ओळखले जाते तेंव्हा तरुण पिढीने त्यांचा आदर्श समोर ठेऊन जीवन जगावे असे आवाहन गावचे उपसरपंच- स्वप्नील पाटील उमरेकर यांनी केले.
   उमरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन गावातील जेष्ठ नागरिक संभाजी पाटील सिरसाट यांचे हस्ते गुलाल लावून व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
यावेळी उपसरपंच- स्वप्नील पाटील उमरेकर, निळकंठ पाटील, शेषराव पाटील, माधवराव पतलाये, पुंडलिक पाटील, किशनराव सिरसाट, बाबाराव पाटील मुकादम, गंगाधर सिरसाट, गोविंद पाटील, विठ्ठल सावकार, सचिन सिरसाट, दाजीराव सिरसाट, समाधान सिरसाट, शशिकांत सिरसाट, रामेश्वर सिरसाट, पवन सिरसाट, सुरेश सिरसाट, विठ्ठल वरपडे, शैलेश सिरसाट, राजेश पुयड, वडजे, आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना स्वप्नील पाटील- म्हणाले की छत्रपती  शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषांतही 60 पेक्षा अधिक पुस्तके आहेत. त्यांना मिळालेली छत्रपती ही एक भारतीय शाही उपाधी आहे. ती राज्याभिषेक झालेल्या हिंदू राजाच्या नावाआधी वापरली जाते. छत्रपती म्हणजे प्रजेवर सतत मायेच छत्र धारण करणारा, म्हणजेच सदैव प्रजेला मदत करणारे व दुःख वेचून घेणारा, प्रजेच्या संरक्षण, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारा प्रजेचे रक्षण करणारा होय. जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या एक अभंगात छत्रपती शब्दाचा उल्लेख आहे. “शिव तुझे नाव। ठेविले पवित्र। छत्रपती सूत्र। विश्वाचे की।” असेही ते म्हणाले.
यावेळी शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष- अभिजीत  सिरसाट, उपाध्यक्ष- मारोती सिरसाट, सचिव- शहाजी सिरसाट, खजिनदार-विजय पांचाळ, कार्याअध्यक्ष- सचिन पांचाळ, सदस्य- गोविंद सिरसाट, श्रीनिवास सिरसाट, आकाश सिरसाट, मारोती वडजे, माणिक पांचाळ, स्वप्नील सिरसाट, यश राठोर, विजय सिरसाट, श्रीनिवास सिरसाट, उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.