प्रतिष्ठा न्यूज

वाचन संस्कृती जपणे काळाची गरज – आर आर कुंभार

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : अलीकडे पाहिलं तर वाचन संस्कृती लोप पावत चाललेली दिसत आहे. आपण वाचनाबद्दल विचार केला तर जेवढे ही महापुरुष झाले ते वाचनातूनच समोर आलेले आहेत. वाचनाने वाणी सुधारते,भाषा सुधारते, ज्ञान वाढते असे अनेक फायदे होतात. म्हणून पुस्तके अथवा ग्रंथ यांच्यासारखा दुसरा गुरु नाही.  म्हणून वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज आहे. असे मनोगत गटशिक्षण अधिकारी आर आर कुंभार यांनी छात्र प्रबोधन दिवाळी अंक वाटप प्रसंगी व्यक्त केले. त्यांचे व केंद्रप्रमुख गांगुर्डे यांचे हस्ते अंकांचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने विविध उपक्रमाचा एक भाग म्हणून मुला-मुलींसाठी परशुराम विद्या मंदिर गगनबावडा येथे  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुट्टी मध्ये वाचन करण्यासाठी १२० मुला-मुलींनी हे दिवाळी अंक स्वतः विकत घेतले.
यावेळी ग्रामपंचायतचे उपसरपंच वृंदा पाध्ये मुख्याध्यापक गोसावी व इतर शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन दिगंबर गिरी बुवा यांनी केले तर आभार एस जे पडवळ यांनी मांडले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.