प्रतिष्ठा न्यूज

दिवाळी सुट्ट्या कमी करण्याचे आदेश रद्द करावेत- मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
संभाजीनगर दि.13 : सतरा सप्टेंबर ते आठ नोव्हेंबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर झाल्या असताना आणि त्याप्रमाणे सर्व नियोजन झालेले असताना दिनांक  बावीस नोव्हेंबर पासून दिवाळी सुट्ट्या जाहीर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांनी काढले आहेत.  दिवाळीच्या सुट्ट्या कमी करण्याचे तुघलकी आदेश रद्द करावेत अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव आणि सरचिटणीस राजकुमार कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव गणेश आजबे यांनी या बाबतीत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की *दिवाळीच्या सुट्ट्या दिनांक सतरा ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर अशा घोषित करण्यात* आल्या आहेत.  त्याप्रमाणे शाळांनी *प्रथम सत्र परीक्षांचे नियोजन* केले आहे. प्रथम सत्र परीक्षा संपताच दिवाळीच्या सुट्ट्या त्याप्रमाणे *पालक आणि विद्यार्थ्यांनी* नियोजन केले आहे.  दिवाळीच्या सुट्ट्यांचा कालावधी *अचानक बदलल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे पूर्वनियोजित नियोजन कोलमडमार* आहे. त्यामुळे दिवाळी सुट्ट्या कमी करण्याचे *तुघलकी आदेश रद्द करावेत* अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे,  जिल्हा सचिव गणेश आजबे , केंद्र कार्यकारिणी सदस्य बंडू आघाव, अशोक मस्कले, नामदेव काळे, सुभाष शेवाळे, विजय गणगे, परवेज देशमुख, व्यंकटराव धायगुडे, हनुमंत घाडगे, गोवर्धन सानप, मनोज सातपुते, तावरे डी. एम, दत्तात्रय चव्हाण, अविनाश काजळे,  युवराज मुरूमकर,  विनोद सवासे, अनुप कुसुमकर, श्रीधर गुट्टे, सुमंत गायकवाड,  विष्णू वळेकर, प्रदीप चव्हाण,  हेमंत धानोरकर, शेख आय. जे, एम.डी. डोळे, अशोक गाडेकर,  शिवाजी ढोबळे, जीवनराव थोरात, बाळासाहेब टिंगरे, दादासाहेब घुमरे, बाळासाहेब काळुशे, शामसुंदर साळुंके,  सुनिल जाधव, श्रीनिवास काकडे,  हनुमंत गवारे, तुळशीदास सोळंके, जगदिश्चंद्र प्रेमचंद तोष्णीवाल, नदीम युसूफ,  पुरुषोत्तम येडे पाटील, संजय गोरे, अलिशान काझी, सुनिल नागरगोजे  सर्व तालुकाध्यक्ष,  तालुका सचिव आणि जिल्हा,  तालुका,  शहर पदाधिकारी यांनी केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.