प्रतिष्ठा न्यूज

गव्हाण येथील निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका : मनसेचे अमोल काळे यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कारवाईची मागणी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : गटविकास अधिकारी तासगांव यांचे कडून आलेल्या अहवालानुसार गव्हाण गावातील निकृष्ट काम करणा-या  ठेकेदारांना काळया यादीत (ब्लॅक लिस्ट मध्ये) समावेश करा अशी मागणी मनसे नेते अमोल काळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांना केली आहे.
दिलेल्या निवेदनात अमोल काळे यांनी सांगितले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि. ३०/०९/२०२२ रोजी ग्रामपंचायत गव्हाण हद्दीत निकृष्ट कामांची चौकशी व्हावी म्हणून निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनाची गंभीर दखल घेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी बांधकाम विभागाच्या उपअभियंता वृंदा पाटील यांना चौकशीचे आदेश दिले व पाटील यांनी तातडीने चौकशी करुन गटविकास अधिकारी यांना चौकशी अहवाल सादर केला या अहवालानुसार त्यांनी संबंधीत ठेकेदार स्वप्नील संजिव पाटील सांगली,शरदचंद्र कृष्णा पाटील सांगली,राजाराम अरुण देसाई गव्हाण या ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट करणेबाबत शिफारस केली आहे.त्यानुसार आपल्याकडून या ठेकेदारांना तातडीने काळया यादीत समाविष्ठ करण्यात यावे तसेच कनिष्ठ अभियंता जे.शेख यांनीही काम निकृष्ट पध्दतीने होत असतानाही संबंधीत ठेकेदारास बिले काढून दिली आहेत. म्हणजेच या सर्व गोष्टीमध्ये शेख याचाही सहभाग आहे.तरी त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात यावी,अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तासगांव तालुका वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.